Chanakya Niti Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या मते, जोडीदार निवडताना 'या' गोष्टींची काळजी घ्या

Relationship Tips : आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात लग्नाचा निर्णय हा सर्वात महत्वाचा असतो.

कोमल दामुद्रे

How to choose your life partner : आचार्य चाणक्य हे विद्वान तसेच महान शिक्षक होते, त्यांनी सांगितलेल्या धोरणांचा अवलंब करून जीवनात यश मिळवता येते. आचार्य चाणक्य नेहमीच पैसा, आरोग्य, व्यवसाय, वैवाहिक जीवन, समाज आणि जीवनातील यश, सुख-दु:खाशी संबंधित गोष्टींची माहिती देत असतात.

या गोष्टींचा अंगीकार कोणत्याही व्यक्तीने आपल्या जीवनात केल्यास तो यशाची नवीन शिखरे गाठू शकतो. आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात लग्नाचा निर्णय हा सर्वात महत्वाचा असतो, जो काळजीपूर्वक विचार करूनच घेतला पाहिजे.

एका चुकीच्या निर्णयाने माणसाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्राच्या श्लोकांद्वारे अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या मुलांनी लग्नापूर्वी मुलींबद्दल जाणून घेतल्या पाहिजेत.

1. सुंदर स्त्रीचे लग्न समान कुटुंबातील नीच पुरुषाशी होऊ नये

आचार्य चाणक्य यांच्या मते, विवाहासाठी (Marriage) बाह्य सौंदर्यापेक्षा स्त्रीच्या आंतरिक गुणांना अधिक महत्त्व दिले पाहिजे. देखावा हा काही दिवसांचा पाहुणा असतो, पण माणसाची गुणवत्ता आयुष्यभर त्याच्यासोबत राहते. तसेच महिलांनीही पुरुषांच्या गुणांना महत्त्व द्यावे.

2. लग्नापूर्वी पुरुषांनी स्त्रियांमध्ये हे गुण पाहावेत

आचार्य चाणक्यांनुसार कोणत्याही पुरुषाने सुंदर स्त्रीच्या मागे न धावता सद्गुणी स्त्रीशी लग्न केले पाहिजे.एक सद्गुणी स्त्री (Women) तुमच्या घराला (Home) स्वर्ग बनवेल आणि प्रत्येक कठीण प्रसंगी ती तुमच्या पाठीशी उभी राहील .

3. राग न येणारा

राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. आचार्य चाणक्य यांच्या मते, रागावलेली स्त्री तुम्हाला कधीही आनंदी ठेवू शकत नाही. म्हणूनच प्रत्येक गोष्टीवर रागावण्यापेक्षा ज्या स्त्रीला राग येत नाही तिच्याशी लग्न करावे.

4. धर्म-कार्यावर विश्वास

विवाहात स्त्री-पुरुष तसेच दोन कुटुंबांमध्ये संबंध निर्माण होतात, धर्म-कार्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती नम्र असते आणि कुटुंबाला एकसंध ठेवते. म्हणूनच लग्नाआधी मुलीची धार्मिक कार्यावर किती श्रद्धा आहे हे तपासले पाहिजे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Train : ऐन गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा, सद्यस्थिती काय?

Maharashtra Live News Update : नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस

Bollywood Divorce: बॉलीवूडमधील सगळ्यात महागडे घटस्फोट, पोटगी जाणून व्हाल थक्क

GK: सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड कोणते आहे? जाणून घ्या

Mumbai Tourism : पाऊस, समुद्रकिनारा अन् गरम चहा; मुंबईतील 'हे' प्रसिद्ध ठिकाण, जेथे असते दिवसरात्र गर्दी

SCROLL FOR NEXT