Remove these things from the bedroom saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips: शास्त्रानुसार आजच 'या' गोष्टी बेडरूममधून काढून टाका; आयुष्यात सुख कधीच येणार नाही

Vastu Tips: ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे वास्तू शास्त्र देखील तितकच महत्त्वाचं मानलं जातं. या शास्त्रानुसार, तुमच्या बेडरूममध्ये काही गोष्टी नसणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. जाणून घेऊया या गोष्टी कोणत्या आहेत.

Surabhi Jagdish

आपल्या घर हे वास्तूच्या शास्त्रानुसार असलं पाहिजे. वास्तू शास्त्रानुसार घरातमध्ये गोष्टी ठेवल्या की सकारात्मकता येते असं मानलं जातं. आपल्या घरात असे अनेक भाग आहेत जसं की, डायनिंग रूम, किचन, बेडरूम इत्यादी. या सर्व ठिकाणांसाठी वास्तू शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांनुसार, तुमच्या घरातील बेडरूममध्ये काही गोष्टी नसणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

घरातील बेडरूम हा असा एक भाग आहे, ज्या ठिकाणी आपण बराच वेळ घालवतो. वास्तू शास्त्रानुसार, तुमच्या घरातील बेडरूममध्ये काही गोष्टी ठेवणं टाळलं पाहिजेत. जर या गोष्टी तुमच्या बेडरूममध्ये असतील तर तुमच्या घरात कलह वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय मानसिक स्थिती आणि आर्थिक हानीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी तुमच्या बेडरूममध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नये हे जाणून घेऊया.

झाडू

वास्तू शास्त्रानुसार, झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. या झाडूद्वारे आपण घराची सफाई करतो. मात्र झाडूला बेडरूममध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं. यामुळे जोडप्यांमध्ये भांडणं होण्याचा धोका असतो. शिवाय तुम्हाला बिझनेसमध्ये नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळे झाडू बेडरूममध्ये ठेवणं टाळलं पाहिजे.

चपला

काही लोकांना त्यांच्या चपला किंवा शूज बेडरूममध्ये ठेवण्याची सवय असते. मात्र असं करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. बेडरूममध्ये चपला ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरात येते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे लक्ष्मी नाराज होण्याचा धोकाही असतो, त्यामुळे तुमचे शुज बेडरूममध्ये ठेवू नयेत.

खरकटी भांडी

वास्तू शास्त्रानुसार, तुमच्या घरात खरकटी भांडी चुकूनही ठेऊ नये. असं करणं तुमच्या भविष्यासाठी अशुभ मानलं जातं. अनेकदा लोकं चहा किंवा नाश्ता केल्यानंतर भांडं बेडरूममध्ये ठेवतात. असं केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येऊन भांडणं वाढण्याचा धोका असतो, त्यामुळे असं करणंही तुम्ही टाळलं पाहिजे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT