abalal rahiman paintings  Saam tv
लाईफस्टाईल

Abalal Rahiman : छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग चित्रीत करणारे आबालाल रहिमान

abalal rahiman paintings : आबालाल रहिमान यांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग चित्रीत केले आहेत. कोल्हापुरातील दळवी कला महाविद्यालयात त्यांनी रेखाटलेल्या चित्रांचाही समावेश आहे.

Saam Tv

नीलेश खरे

कोल्हापुरातील दळवी कला महाविद्यालयात अजय दळवी यांच्या संग्रहातील उत्कृष्ट चित्रकारांची चित्रे पाहण्याचा योग आला. त्यात आबालाल रहिमान यांच्या चित्राचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

आबालाल रहिमान (१८६०–१९३१)

कोल्हापुरात जन्मलेल्या आबालाल यांच्या घराण्यात कुराणाच्या हस्तलिखितांचे सुलेखन आणि चितारकामाची परंपरा होती. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात कारकून होते. आबालाल यांनी बालवयातच वडिलांना कुराणाच्या प्रत रंगवण्यात मदत करत चित्रकलेची गोडी जोपासली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग चित्रित करणारी चित्रे त्यांनी काढली. जी चित्रे सांगली आणि कोल्हापूर येथील संग्रहालयांत जतन केली आहेत. याशिवाय, कुराणाच्या सजवलेल्या हस्तलिखितांनीही त्यांची कला समृद्ध केली.

कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि कलात्मक मर्यादित वातावरणातही त्यांनी १९२०-२१ च्या सुमारास अशा कलामुल्यांचा शोध लावला. जे मुंबईतील कलाकारांना १९३५ सालापर्यंत रुजण्यास वेळ लागला.

आबालाल यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले. जिथे ते कोल्हापूरचे पहिले विद्यार्थी होते. त्यांना रिजन्सी काउन्सिल आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या शिष्यवृत्तीमुळे आर्थिक पाठबळ मिळाले.

kolhapur news

प्राचार्य जॉन ग्रिफिथ्स यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हुशार विद्यार्थी म्हणून नाव कमावले आणि १८८८ सालामध्ये त्यांच्या चित्रसंचासाठी व्हाइसरॉय सुवर्णपदक मिळाले.

रावबहादुर धुरंधर यांनी आपल्या पुस्तकात आबालाल यांच्या कलागुणांचा आणि शिक्षकवर्गातील आदराचा उल्लेख केला आहे.

आबालाल यांनी लग्न केले नाही. कारण त्यांना आवडलेल्या मुलीशी लग्न होऊ शकले नाही. त्यांनी आपले आयुष्य कलेला आणि एकांताला समर्पित केले.

त्यांना मराठी, संस्कृत, अरबी आणि इंग्रजी भाषा अवगत होत्या. ज्यामुळे त्यांच्या कलाकृतींना सांस्कृतिक वैविध्य लाभले.

आबालाल रहिमान यांची चित्रशैली ही वास्तववादी असूनही भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होती. कोल्हापूरच्या एकांतात राहूनही त्यांनी निर्माण केलेली हजारो चित्रे आणि त्यांचा कलात्मक शोध हा मराठी चित्रकलेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांची दुर्मिळ चित्रे कोल्हापूरच्या न्यू पॅलेस, टाऊन हॉल आणि सांगलीतील संग्रहालयांत आजही अभ्यासक आणि कला प्रेमींसाठी प्रेरणादायी ठरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT