Holi Festival 2023
Holi Festival 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Holi Festival 2023 : आता काय म्हणावं? धुळवडीच्या दिवशी गावात निघते जावयाची गाढवावरून मिरवणूक; काय आहे कारण?

विनोद जिरे

Beed Holi News : होळी म्हटलं की, सर्वत्र त्याची धामधूम असते. गावी या दिवशी पालखी, मिरवणूक निघते. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी मोठ्या उत्सहात खेळली जाते. हा सण जवजवळ पाच दिवस खेळला जातो.

परंतु, आपण नेहमीच काही अनोख्या किंवा नवीने प्रथेबद्दल ऐकत असतोच पण गाढवावरुन धिंड काढली जाते हे आपण सगळ्यांनी ऐकलेच असेल पण अशीच एक अनोखी प्रथा बीडच्या (Beed) विडा गावात साजरी (Celebrate) केली जाते. या गावात (Village) धूलिवंदनाच्या दिवशी‎ जावई बापुची गाढवावरून मिरवणूक‎ काढण्याची अनोखी परंपरा आहे.

परंपरा जपण्यासाठी व जावयाच्या‎ शोधासाठी जावई शोध समिती स्थापन करण्यात आली असून जावयाचा शोध सुरु आहे. गाढवावरुन मिरवणूकीच्या भीतीने गावातील जवळपास 200 जावई हे पळून गेल्याचे समोर आले त्यामुळे यंदा कोणत्या जावयाची मिरवणूक निघणार याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

परंपरा कायम‎ ठेवण्यासाठी धुळवडीच्या दोन दिवस‎ अगोदर गावातील तरुण एकत्र येऊन‎ जावई शोध समिती नेमतात. एका‎ जावयास ताब्यात घेऊन‎ धुळवडीपर्यत निगरानीखाली ठेवले‎ जाते.

धुळवडीच्या दिवशी सकाळी‎ ग्रामपंचायतीसमोर गाढव आणून‎ चपलेचा हार घालून मिरवणुकीला‎ सुरू होते. गावातील प्रमुख‎ रस्त्यांवरून दुपारपर्यंत मिरवणूक‎ हनुमान मंदिरासमोर पोहोचते. या‎ ठिकाणी लोकवर्गणीतून जमलेल्या‎ पैशांतून खरेदी केलेल्या कपड्यांचा‎ आहेर गावातील प्रतिष्ठितांच्या हस्ते‎ जावयाला दिला जातो. शिवाय‎ जावईबापूला सासऱ्याच्या ऐपतीनुसार‎ सोन्याची अंगठी देखील भेट दिली जाते.‎दरम्यान या विडेकरांच्या अनोख्या परंपरेची प्रत्येकांला एकप्रकारे प्रतीक्षा लागलेली असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dr. Anjali Nimbalkar : डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रचारातही निभावली ड्यूटी ; अपघातातील जखमीला उपचार करत स्वतः घातले टाके

Shivani Narayanan: बॉलीवूडच्या नटीही भरतील पाणी, फक्त सुंदर नाही भारी दिसते साऊथची 'शिवानी'

Grapes Juice : द्राक्षाचा ज्युस प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Badam Oil : स्कीन केअरसाठी बदाम तेलाचे ६ आश्चर्यकारक फायदे

Mumbai News: मुंबईत चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT