Baba Vanga Prediction saam tv
लाईफस्टाईल

Baba Vanga Prediction: 5 जुलै रोजी जगावर येणार भयंकर संकट; बाबा वेंगांची ही भविष्यवाणीही ठरणार खरी? पाहा भारतीय ज्योतिष्यशास्त्र काय सांगतं...

Baba Vanga Future Prediction: ५ जुलै २०२५ रोजी जगावर मोठे संकट येणार असल्याची एक भविष्यवाणी व्हायरल होतेय. 'नवीन बाबा वेंगा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानी मंगा कलाकार रयो तात्सुकी यांच्या एका पुस्तकाशी जोडले जात आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बल्गेरियाचे बाबा वेंगा हे त्यांच्या भविष्यवाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अशातच आता जपानचे बाबा वेंगा सध्या फार चर्चेत आहेत. जपानी बाबा वांगा रियो तात्सुकी यांनी ५ जुलै बद्दल एक भविष्यवाणी केली आहे. यावेळी त्यांनी केलेली भविष्यवाणी जगभरात वेगाने व्हायरल होतेय. जपानी बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीनुसार, येत्या ५ जुलै रोजी काही मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतीय ज्योतिषशास्त्राने या भविष्यवाणीबाबत काही गोष्टी उघड करण्यास सुरुवात केली तेव्हा जे समोर आलं ते फार धक्कादायक होतं.

५ जुलैसाठी जपानी बाबा वेंगाची भविष्यवाणी काय सांगते?

जपानी बाबा र्यो तात्सुकी, ज्यांना जपानी बाबा वांगा म्हणून ओळखलं जातं. त्यांची एक भविष्यवाणी आजकाल मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. त्यांच्या मते, २०२५ मध्ये जपानमध्ये एक मोठी नैसर्गिक आपत्ती येण्याचा धोका आहे. र्यो तात्सुकी यांच्या ग्राफिक कॉमिक (मंगा) "द फ्युचर आय सॉ" नुसार, एका धोकाादायक आपत्ती येणार असल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की, जपानच्या दक्षिणेकडील समुद्रातील समुद्रातून ज्वालामुखीचा उद्रेक होईल.

दरम्यान यामुळे भयानक त्सुनामी येऊ शकते. त्यांच्या पुस्तकात पुढे असंही म्हटलंय की, ही त्सुनामी २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या त्सुनामीपेक्षाही धोकादायक असणार आहे. या काळात खूप जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. त्यांची भविष्यवाणी सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.

भारतीय ज्योतिष्यशास्त्र काय सांगतं?

भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, ५ जुलै रोजी ग्रहांचं मोठं अशुभ संयोजन नाहीये मात्र तरीही जुलैच्या शेवटी अशा ग्रहांची परिस्थिती निर्माण होईल ज्यांना ज्योतिष्यात शुभ मानली जात नाही. यावेळी मोठ्या अपघाताची किंवा नैसर्गिक आपत्तीची भीती बाळगली जातेय. ज्याचा परिणाम केवळ देशावरच नाही तर जगभरात दिसून येतो.

५ जुलै नाही तर या दिवशी राहा सतर्क

भारतीय ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, जेव्हा कोणतीही मोठी आपत्ती येते तेव्हा ती अमावस्या आणि पौर्णिमेच्या आसपास येते. त्याचप्रमाणे ज्यावेळी मोठी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा असं दिसून आलंय की, शनि, मंगळ, गुरू, राहू ग्रह केंद्र किंवा त्रिकोणात स्थित असतात. त्यामुळे मोठी नैसर्गिक घटना घडण्याची शक्यता असते.

५ जुलै रोजी चंद्र तूळ राशीत असणार आहे. तर गुरूची चंद्रावर दृष्टी असणार आहे. त्याच वेळी, २४ जुलै रोजी मंगळ आणि केतू देखील एकाच अंशाने युती करत आहेत. तर बुध आणि चंद्र देखील यावेळी कर्क राशीत आहेत. तर शनि यावेळी जल तत्व राशीत मीन राशीत आहे. अशा परिस्थितीत, ५ जुलैपेक्षा २४ जुलै रोजी अधिक विनाशकारी योग तयार होतोय. अशातच अमावस्या २४ जुलै रोजी आहे, त्यामुळे २४ जुलैच्या आसपास, जपानमध्ये समुद्री वादळ आणि भारतातील डोंगराळ भागात ढग फुटणं यासारख्या घटनांमुळे जीवित हानी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

SCROLL FOR NEXT