अनिश्चिततेत आशेचा किरण- भाग १ Saam Tv
लाईफस्टाईल

अनिश्चिततेत आशेचा किरण- भाग १

'A lot is going on in life' असं अनेकांचं झालं आहे. या बरंच काही बरोबर अजून एक गोष्ट सर्वत्र पसरली आहे ती म्हणजे 'अनिश्चितता'.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या आपल्या आजूबाजूला, घरात, कामकाजात, मनात बरंच काही चालू आहे. 'A lot is going on in life' असं अनेकांचं झालं आहे. या बरंच काही बरोबर अजून एक गोष्ट सर्वत्र पसरली आहे ती म्हणजे 'अनिश्चितता'. खरंतर या दोन्ही गोष्टी नेहमीच आयुष्यात असतात, पण गेल्या एक वर्षाच्या कोरोनाच्या काळात यांचं असणं प्रकर्षाने जाणवू लागलं आहे. A ray of hope in uncertainty Part 1

हा काळ कठीण जरी असला तरी याचा उपयोग कसा करून घेता येईल असा विचार ठेवला तर नक्कीच असहाय्य आणि हतबल वाटणार नाही. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद झाले, उत्पन्न कमी झालं, नवीन येणारं काम आलं नाही, हातातले प्रोजेक्टस् गेले, नाती कोलमडली, विरह सहन करावा लागला, एक प्रकारची अपूर्णतेची भावना व पोकळी जाणवू लागली. परंतु बाहेर काहीही झालं तरी फुलांच्या उमलण्यात, सुगंध आणि सौंदर्य पसरवण्यात खंड पडत नाही, तसं आपल्या निर्धारात, नियमात आणि आचरणात अखंडता असावी. बाहेरील परिस्थितीचा गुलाम न होण्यासाठी या पहिल्या भागात दृष्टिकोन आणि स्थिरता या दोन पैलूंचं महत्त्व जाणून घेऊयात..

हे देखील पहा-

दृष्टिकोन -

डाळिंब सोलताना काही सडलेले, अति पिकलेले दाणे जसे फेकून देतो, तसे अनावश्यक विचारांचं विलगीकरण करून त्यांना थारा देऊ नका. आजवर गोळा केलेले अनुभव, माहिती आणि वागण्याचा ढाचा आपल्या मनात कायम घर करून राहतात. वर्षानुवर्षे एकाच साच्यात राहिल्यामुळे त्याच विचारधारेत पुन्हा आपण गुंतून राहतो. सजगता आणि विवेकबुद्धी यांच्या संयोगाने जो दृष्टिकोन तयार होईल तो बाहेरील परिस्थितीशी दोन हात करायला मदत करेल.

स्थिरता -

आपण शाळेतून कॉलेजमध्ये, तिथून नोकरी मग एका कंपनीतून दुसर्‍या कंपनीत किंवा व्यवसाय असं एकामागून एक रेल्वेच्या डब्याप्रमाणे काही ना काही चालूच ठेवतो. नोकरी गेली, पैसे कमी मिळाले, करियरमध्ये ब्रेक आला की आता पुढे काय करायचं या अनिश्चिततेने आपण पार गोंधळून जातो. कारण सतत काही ना काही करण्याची सवय लागलेली असते. जसं आयुष्यातील प्रत्येक वर्ष भरलेलं असतं तसंच दिवसातील प्रत्येक क्षण आपण खच्चून भरून ठेवतो. दोन गोष्टींमध्ये, कृतीमध्ये, विचारांमध्ये जागा (space) निर्माण केली तर जीवनात अचानक आलेल्या या बऱ्याच मोठ्या स्पेसने गोंधळायला होणार नाही. यासाठी रोज थोडा वेळ तरी निर्विचार, नि:शब्द, निश्चल राहण्याची सवय लावावी.

यापुढील भागात आपण स्वाध्याय आणि कृती या दोन पैलूंचं महत्त्व जाणून घेणार आहोत.

Edited By-Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT