Monday Upay saam tv
लाईफस्टाईल

Sawan Somvar Upay: श्रावणाच्या पहिल्या सोमवारी बनतोय दुर्लभ संयोग; 'या' उपायांनी दूर होईल आर्थिक तंगी

First Shravan Somwar 2025 : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. हा महिना भगवान शंकराला समर्पित असून, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार (श्रावण सोमवार) विशेष फलदायी असतो.

Surabhi Jayashree Jagdish

श्रावण महिना हा भक्तिभाव आणि पुण्याच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो. हा महिना पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित असतो. यावेळी मंदिरांमध्ये हर हर महादेवचा जयघोष सुरू होतो. यावेळी शिवभक्त जल, दूध, बेलपत्र, धोत्रा अर्पण करून शिवलिंगाची पूजा करतात. या काळात उपवास, जप आणि दानाचं विशेष महत्त्व असतं.

श्रावणाचा पहिला सोमवार का असतो विशेष?

श्रावणाचा महिन्याचा पहिला सोमवार हा सर्वात शुभ मानला जातो. या दिवशी उपवास, रुद्राभिषेक, अभिषेक, जप-तप केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असं मानलं जातं. आर्थिक समस्या, आरोग्याच्या अडचणी, वैवाहिक विलंब, अशा अनेक अडथळ्यांपासून सुटका होण्यासाठी हा दिवस उपयुक्त मानला जातो.

या वर्षी श्रावणी सोमवारला शुभ योग

या वर्षी पहिल्या श्रावणातील सोमवारला संकष्टी चतुर्थी आहे. हा दिवस गणपतीची पूजा करण्याचा शुभ दिवस आहे. शिव आणि गणेशाची एकत्र उपासना केल्यास सर्व अडथळे दूर होतात. याच दिवशी ‘शिव वास’, ‘आयुष्मान’ आणि ‘सौभाग्य’ योग तयार होतात. जे दीर्घायुष्य, आरोग्य आणि सौख्य देणारे मानले जातात.

आर्थिक आणि वैयक्तिक समस्यांवर उपाय

श्रावणाच्या प्रत्येक सोमवारला लवकर उठून स्नान करा. यावेळी स्वच्छ कपडे घाला आणि जवळच्या शिवमंदिरात जा. शिवलिंगावर गंगाजल आणि शुद्ध जल अर्पण करा. नंतर रोळी आणि अक्षताने तिलक करा आणि साखर, फळांचा नैवेद्य अर्पण करून प्रार्थना करा. या उपायाने धनवृद्धी आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं.

कामात यश आणि समाजात सन्मान मिळवण्यासाठी

जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात यश हवं असेल, तर सोमवारच्या दिवशी पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करा. अभिषेक करताना तुमच्या मनातील उद्दिष्टांचा उच्चार करत राहा. हा उपाय आत्मविश्वास वाढवतो. तुमच्या कामात मान-सन्मान व प्रगतीची दारे उघडतो.

लग्नात अडथळा येत असल्यास उपाय

लग्न होण्यामध्ये अडथळा येत असल्यास किंवा वेळ लागत असल्यास, केशर मिसळलेलं जल शिवलिंगावर अर्पण करा. ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करत रुद्राभिषेक करा. हे उपाय विवाह विषयक त्रास दूर करून लवकर शुभ बातमी मिळवण्यास मदत करतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT