हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका हा जीवघेणा मानला जातो. दरवर्षी लाखो लोक हृदयविकारामुळे मृत्यूमुखी पडतात. 2022 मध्ये सुमारे 2 कोटी लोकांचा मृत्यू फक्त हार्ट अटॅकमुळे झाला असल्याचं आकडेवारी सांगते. सहज बोलता-बोलता अचानक मृत्यू झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल यामागे कारण हार्ट अटॅक असू शकतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, हार्ट अटॅकचा धोका जसाजसा वाढतो तसंच प्रत्येकाने याबाबत सतर्क राहणं गरजेचं आहे. जीवनशैलीत योग्य बदल करून आणि आहार सुधारून आपण हृदयाचे आरोग्य सुधारू शकतो आणि हृदयविकारापासून धोका कमी करतो. हार्ट अटॅकच्या वेळी लक्षणं ओळखून वेळेत CPR दिला आणि उपचार मिळाले, तर रुग्णाचा जीव वाचवता येतो. मात्र अनेक केसेसमध्ये हार्ट अटॅकचं कोणतंही लक्षण दिसत नाही.
प्रसिद्ध हृदयतज्ज्ञ आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, सुमारे 20% हार्ट अटॅकचे प्रकार ‘साइलेंट’ असतात, म्हणजे कोणतीही ठळक लक्षण दिसत नाहीत. कधी कधी हृदय अचानक रक्त पंप करणं बंद करतं किंवा धडधड अचानक अनियमित होते, आणि तेही हार्ट अटॅकचं कारण बनतं. अशा वेळी रुग्णाला फक्त थोडी अस्वस्थता वाटते किंवा तो बेशुद्ध होतो. मात्र योग्य निदान केल्यानंतरच समजतं की हार्ट अटॅक आला होता.
साइलेंट हार्ट अटॅक (Silent Myocardial Infarction) म्हणजे असा हार्ट अटॅक ज्यामध्ये व्यक्तीच्या छातीमध्ये तीव्र वेदना, श्वास घ्यायला त्रास अशी सामान्य लक्षणं दिसत नाहीत. हा प्रकार मुख्यतः महिलांमध्ये आणि मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये जास्त दिसतो.
या हार्ट अटॅकमध्ये लक्षणं इतकी सौम्य असतात की सामान्यतः लोक याकडे दुर्लक्ष करतात. ही लक्षणं सामान्य वाटू शकतात, त्यामुळे लोक त्याला हार्ट अटॅक समजतच नाहीत.
सततचा थकवा
अपचन
चक्कर येणं
अंगावर शहारा येणं
शरीर सुस्त वाटणं
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, काही जोखीमीचे घटक लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये जास्त वजन (BMI 25 पेक्षा जास्त) असणाऱ्यांना हा धोका असतो. त्याचप्रमाणे व्यायामाचा अभाव, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल, मधुमेह तसंच कुटुंबात हार्ट डिसीजचा इतिहास हे सगळे घटक असतील, तर तुम्हाला साइलेंट हार्ट अटॅकचा धोका असू शकतो. अशा वेळी डॉक्टरांकडे तपासणी करणं गरजेचं आहे.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.