75th Independence Day, Historic Places Saam Tv
लाईफस्टाईल

75th Independence Day : १५ ऑगस्टपर्यंत या ऐतिहासिक वास्तूंना विनामूल्य एंट्री, जाणून घ्या!

१५ ऑगस्टपूर्वी या ऐतिहासिक स्थळांना भेट द्या.

कोमल दामुद्रे

75th Independence Day : भारत हा विविधतेचा आणि अनेक संस्कृतीने नटलेला पंरपरेचा देश आहे. येथील प्रत्येक घटनांचा इतिहास अनोखा आहे.

भारतात (India) आजही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रसिध्द व जुन्या आहेत. ही संस्कृतीने बांधलेली स्मारके दिसण्यास सुंदर व अनेक ऐतिहासक क्षणांची आठवण करुन देतात. भारतात अशी अनेक शहरे आहेत, अनेक सुंदर ठिकाणे आहेत, जी वर्षभर पर्यटकांना आकर्षित करतात.

देशावर अनेक वर्षे राज्य करणाऱ्या मुघलकालीन सभ्यतेने बांधलेल्या अनेक वास्तू व स्मारके आजही अस्तित्वात आहेत. जे उत्कृष्ट वास्तुकलेचा आणि कारागिरीचा नमुना आहे. आज अशा अनेक प्राचीन स्मारके आणि राजवाड्यांबद्दल जाणून घेऊया.

तुम्हाला ऐतिहासिक (Historical) वास्तू पाहण्यात रस असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण १५ ऑगस्टपर्यंत ही ठिकाणे विनामूल्य एक्सप्लोर करू शकता. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित स्मारकांना मोफत फिरण्याची सुविधा देण्यात आली आहे, तुम्ही कोणती ठिकाणे फिरू शकता हे जाणून घ्या.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत उपक्रम

स्वतंत्र भारताला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारने अमृत महोत्सवाचे आयोजन केले आहे. तसेच, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने संरक्षित केलेल्या वास्तूंना मोफत भेट देण्याची सुविधाही सरकारने दिली आहे.

या स्मारकांना विनामूल्य भेट देऊ शकता.

Taj Mahal

१५ ऑगस्टपर्यंत तुम्ही आग्रा मधील ताजमहाल पूर्णपणे विनामूल्य एक्सप्लोर करू शकता. आग्राचा ताजमहाल, प्रेमाचे प्रतिक म्हणून पाहिला जातो. ताजमहाल जगातील सात आश्चर्यांमध्ये गणला जातो. १६३१ ते १६४३ दरम्यान मुघल सम्राट शाहाजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधले होते. पांढऱ्या संगमरवरी बनवलेल्या ताजमहालला अरबीमध्ये ताज ऑफ पॅलेसेस म्हणतात.

Humayun's Tomb

हुमायूनची कबर मुघलांच्या सुंदर वास्तुकला आणि स्मारकांमध्ये देखील येते, जी भारतातील उत्कृष्ट वास्तूंपैकी एक आहे. ही भव्य समाधी १५७२ च्या सुमारास मुघल सम्राट हुमायूनच्या स्मरणार्थ बांधली होती. हे शहराचे एक आकर्षक आणि तात्विक चिन्ह आहे. तुम्हीही या सुंदर वास्तूला अवश्य भेट द्या.

Red Fort

शाहजहानच्या कारकिर्दीत बांधलेला लाल किल्ला हा भारतातील महत्त्वाच्या मुघल वास्तूंपैकी एक आहे. येथे दरवर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवतात आणि देशाला संबोधित करतात. वर्षभर लोक इथे फिरायला येत असले तरी आपल्याला मोफत फिरायचे असेल तर १५ ऑगस्टपूर्वी जा. येथे किल्ल्याशिवाय दिवाण-ए-आम, दिवाण-ए-खास, मोती मशीद, रंगा महल आणि मीना बाजार इत्यादी इतर अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू देखील आपण पाहू शकता.

qutub minar

तसेच आपण कुतुबमिनार देखील विनामूल्य पाहू शकतो. हा टॉवर त्याच्या हस्तकला आणि सुंदर पर्यटन स्थळांसाठीही जगभरात ओळखला जातो. त्याची एकूण उंची ७२.५ मीटर आहे आणि त्याला ३७९ पायऱ्या आहेत. कुतुबमिनार पाहण्यासोबतच येथील प्रसिद्ध खाद्यपदार्थाचा आस्वादही घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT