Toyota Solid State Battery Saam Tv
लाईफस्टाईल

Toyota EV: 10 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये मुंबई-पुणे 6 फेऱ्या मारता येणार; टोयोटा तयार करत आहे सॉलिड-स्टेट बॅटरी

Toyota Solid State Battery: 10 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये मुंबई-पुणे 6 फेऱ्या मारता येणार; टोयोटा तयार करत आहे सॉलिड-स्टेट बॅटरी

Satish Kengar

Toyota Solid State Battery: 

प्रसिद्ध जपानी वाहन उत्पदक कंपनी टोयोटा सध्याच्या बॅटरीप्रमाणेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी सॉलिड-स्टेट बॅटरीज तयार करत आहे, असं वृत्त फायनान्शिअल टाइम्सने दिलं आहे. या वृत्तानुसार, कंपनीच्या सॉलिड-स्टेट बॅटरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन 2027 किंवा 2028 पर्यंत सुरू होऊ शकते.

कंपनीने काय दिली माहिती?

टोयोटाने अलीकडेच म्हटले आहे की, त्यांनी एक मैलाचा दगड गाठला आहे. ज्यामुळे या बॅटरीची किंमत आणि आकार अर्धा होऊ शकतो. टोयोटाने सांगितले की, यशस्वी झाल्यास सॉलिड-स्टेट बॅटरी ईव्हीची रेंज 1,200 किमी म्हणजेच दुप्पट करतील. तसेच चार्जिंग टाइम फक्त 10 मिनिटे किंवा त्याहून कमी होणार. गेल्या आठवड्यात टोयोटाने सॉलिड-स्टेट बॅटरीच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी तंत्रज्ञानावर इडेमित्सू या जपानी तेल कंपनीसोबत करार केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ईव्ही तंत्रज्ञानात क्रांती होणार

एका मीडिया रिपोर्टनुसार, हा करार टोयोटासाठी महत्त्वपूर्ण आहे. जो टेस्ला आणि चीनच्या BYD सारख्या प्रतिस्पर्ध्यांच्या मागे टाकण्यात कंपनीला मदत करेल. पेट्रोल इंजिन आणि बॅटरीवर चालणाऱ्या मोटर्सने सुसज्ज असलेल्या प्रियस सारख्या हायब्रीड कारच्या यशामुळे टोयोटा ईव्ही सेगमेंटमध्ये काही प्रमाणात मागे पडली आहे. (Latest Marathi News)

टोयोटाचे मुख्य कार्यकारी कोजी सातो यांनी पत्रकारांना सांगितले की, "टेस्टिंग आणि त्रुटीचा समावेश असलेल्या प्रयत्नांद्वारे, आम्ही असं मटेरियल्स तयार करण्यात यशस्वी झालो आहोत, जे अधिक स्थिर आणि ज्याची खराब होंण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यांनी सांगितलं की, मोबिलिटीचे भविष्य ऑटो आणि ऊर्जा क्षेत्रांमधील भागीदारीमध्ये आहे, ज्यामध्ये जपानच्या या नवकल्पनाचा समावेश आहे.

सॉलिड-स्टेट बॅटरी काय आहेत?

सॉलिड-स्टेट बॅटरी कॅथोड, एनोड आणि सॉलिड इलेक्ट्रोलाइटने बनलेली असते. ही लिथियम-आयन बॅटरीपेक्षा वेगळी आहे, जी लिक्विड इलेक्ट्रोलाइट वापरते. सध्याच्या लिथियम-आयन बॅटरीमध्ये फुगणे किंवा गळती होणे, यासारख्या गोष्टी घडतात. ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यामध्ये आग लागण्याचाही धोका जास्त असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT