50 Crore WhatsApp Users Leak SAAM TV
लाईफस्टाईल

Whatsapp Users : सावधान! ५० कोटी व्हॉट्सअॅप नंबर लीक; तुमचा तर मोबाइल क्रमांक नाही ना?

व्हॉट्सअॅप यूजरसाठी महत्वाची बातमी आहे. ५० कोटी व्हॉट्सअॅप मोबाइल नंबर लीक झाल्याचे वृत्त आहे.

Nandkumar Joshi

WhatsApp Numbers Sell Online : व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी धक्कादायक बातमी आहे. व्हॉट्सअॅपच्या जवळपास ५० कोटी यूजर्सचे फोन नंबर लीक झाले आहेत. ते मोबाइल क्रमांक ऑनलाइन विक्रीसाठी देण्यात आल्याची भीती एका रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

सायबर न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, एका हॅकिंग कम्युनिटी फोरमवर एक जाहिरात शेअर करण्यात आली आहे. त्यात जवळपास ५० कोटी व्हॉट्सअॅप यूजरचे मोबाइल क्रमांक विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असा दावा करण्यात आला आहे. डेटाबेसमध्ये वेगवेगळ्या ८४ देशांमधील व्हॉट्सअॅप यूजरचे मोबाइल क्रमांक उपलब्ध आहेत. त्यात अमेरिका, ब्रिटन, जपान, इटली, सौदी अरेबिया आणि भारताचा समावेश आहे. (WhatsApp News)

या डेटाचा सायबर गुन्हेगारांकडून मुख्यत्वाने फिशिंग अॅटॅकसाठी वापर केला जातो. त्यामुळे व्हॉट्सअॅप यूजर्सना अनोळखी क्रमांक, कॉल आणि मेसेजपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. हॅकिंग फोरमच्या दाव्यानुसार, या डेटामध्ये ३.२ कोटींपेक्षा अधिक अमेरिकी यूजरचे फोन क्रमांक उपलब्ध आहेत. जपानचे साडेचार कोटी, इटलीचे साडेतीन कोटी, सौदी अरेबियाचे २.९ कोटी, दोन कोटी फ्रान्स आणि २ कोटी तुर्कस्थानचे मोबाइल क्रमांक आहेत. रशियाचे १ कोटी मोबाइल क्रमांक, ब्रिटनचे १.१ कोटी नंबर आहेत. (Mobile Users)

रिपोर्टनुसार, सायबर गुन्हेगारांकडून अमेरिकी यूजरचा डेटा ५ लाख ७१ हजार ६९० रुपयांना विकला जात आहे. ब्रिटनचा डेटा अंदाजे दोन लाख चार लाख १७५ रुपयांना विकला जात आहे. तर जर्मनीचा डेटाबेस एक लाख ६३ हजार ३४० रुपयांन ाविकला जात आहे.

अॅक्टिव्ह यूजरचा डेटा

दरम्यान, सर्व मोबाइल नंबर हे मेटाच्या स्वामित्त्व असलेल्या प्लॅटफॉर्मवरील अॅक्टिव्ह यूजर्स आहेत, असा दावा डेटा ऑनलाइन विकणाऱ्यांनी केला आहे. हे पहिल्यांदा घडलेले नाही. मेटा आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील डेटा उल्लंघनाच्या बातम्या यापूर्वीही आल्या आहेत. गेल्या वर्षीही ५० कोटींहून अधिक सोशल मीडिया यूजर्सची माहिती ऑनलाइन विक्री होणार असल्याची माहिती सायबर गुन्हेगारांनी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

SCROLL FOR NEXT