Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : किशोरवयीन अवस्थेतील मुलांना शिकवा 'या' 5 गोष्टी, भविष्यासाठी ठरतील फायदेशीर !

Teenage Child : टिनएजमध्ये गेल्यावर मुलांमधील लहानपण निघून जाते आणि त्यांच्या आयुष्यात भरपूर बदल होतात.

कोमल दामुद्रे

Saving Tips For Teenage Child : किशोरावस्था हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय नाजूक वय असते. टिनएजमध्ये गेल्यावर मुलांमधील लहानपण निघून जाते आणि त्यांच्या आयुष्यात भरपूर बदल होतात.

खास करून मुलींना टीनेजमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तुमची मुलगी सुद्धा टीनेजमध्ये असेल तर या गोष्टी सांगून तुम्ही तिच आयुष्य सोपं बनवू शकता. टीनएजमध्ये प्रवेश केल्यानंतर मुला मुलींसाठी अनेक गोष्टी नवीन असतात.

अशावेळी कॉलेजमध्ये (Collage) जाणाऱ्या मुलींना मनी (Money) मॅनेजमेंटच्या टीप्स देणे अत्यंत गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, टिनएजमधील मुलींनी कशाप्रकारे पैशांची बचत कशी करायला हवी हे जाणून घेऊया

1. बँकेबद्दल माहिती सांगा :

शाळेनंतर कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक मुलींना बँकेबद्दल फारशी माहिती नसते. अशावेळी तुम्ही तुमच्या मुलींना बँकेमध्ये (Bank) अकाउंट खोलण्यासोबत ते क्रेडिट अँड डेबिटकार्ड बद्दलची माहिती आणि ऑनलाइन (Online) बँकिंगचा व्यवहार समजवून सांगावा.

2. बजेट बनवायला शिकवा :

अनेकदा मुली स्वतःची पॉकेटमनी काही दिवसांमध्येच खर्च करून टाकतात. ज्यामुळे मुलं बजेट मॅनेजमेंट करू शकत नाहीत. अशावेळी तुम्ही तुमच्या मुलींना महिनाभराचा बजेट बनवण्याचा सल्ला द्या आणि तुमच्या मुला-मुलींना बजेटनुसारच पैसे हातात द्या. असं केल्याने तुमची मुलगी तुमचे पैसे वाया घालवणार नाही.

3. सेविंग करायला शिकवा :

टीनएज मुलींना पैसे सेविंग कसे करावे हे शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या मुलींना दररोज थोडे थोडे पैसे सेविंग करण्याचा सल्ला द्या. सोबतच साचवलेल्या पैशांना एखाद्या चांगल्या ठिकाणी इन्वेस्ट करा. असं केल्याने तुमची मुलगी चांगल्या ठिकाणी पैसे इन्वेस्ट करून स्वतःचे भविष्य सिक्युअर करेल.

4. क्रेडिट रेटिंग बद्दल सांगा :

टीनएजनंतर मुलांना बँकेमधून लोन घेण्याची वेळ देखील येऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलींना आधीच क्रेडिट रेटिंग बद्दल माहिती द्या. तुम्ही तुमच्या मुलींना सांगा की, क्रेडिट रेटिंग चांगली ठेवल्याने लोन आणि क्रेडिट लवकर मिळते.

5. रिझर्व फंड शिकवा :

तुम्ही तुमच्या मुलींना इमर्जन्सी सीच्युवेशनसाठी पैसे साठवण्याचा सल्ला द्या. यासाठी तुम्ही तुमच्या मुलींना रिझर्व फंड आणि अभ्यासासाठी एक वेगळा फंड बनवण्याचा सल्ला द्या. जेणेकरून तुमच्या मुलीच्या भविष्याची चिंता मिटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT