कोमल दामुद्रे
सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरु झाला असल्याने तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे.
या दिवसांत गरमी, उष्मा, ऊन वाढते त्यामुळे अनेकजण वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांनी हैराण असतात.
लख्ख सूर्यप्रकाश असलेले दिवस मुलांसाठी एक ट्रीट असतात आणि त्यांना घराबाहेर खेळायला आवडते.
मुलासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जास्त ऊन असलेल्या वेळेत म्हणजेच सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत त्यांना उन्हात पाठवू नये.
उन्हामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी आपण काय करू शकता याची माहिती येथे दिली आहे.
मुलाला सुरक्षित ठेवा
हलक्या रंगाचे कपडे घाला
बेबी सनस्क्रीन वापरा
भरपूर पाणी प्यायला द्या
उन्हातून थोडा वेळ सावलीत जाण्यास सांगा