Parenting Tips : मुलांच्या हट्टीपणाचा तुम्हाला राग येतो ? मग अशा पद्धतीने ठेवा रागावर नियंत्रण !

Child Care Tips : तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांच्या चुकांवरती भरपूर राग येत असेल तर , अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकता.
Parenting Tips
Parenting TipsSaam Tv
Published On

Parenting Tips : लहान मुलं छोट्या छोट्या चुका करतच असतात. अशातच अनेक पालक त्यांच्या पाल्याची चुकी त्याला प्रेमाने आणि शांतपने समजावून सांगतात. तर काही पालक त्यांच्या मुलांना अद्दल घडविण्यासाठी त्यांना ओरडा देतात आणि मारहाण करतात.

परंतू असे करणे अत्यंत चुकीचे आहे. अशातच तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांच्या चुकांवरती भरपूर राग येत असेल तर , अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकता.

Parenting Tips
Parenting Tips : परीक्षेच्या काळात मुलांना ताण येतो 'या' टिप्स फॉलो करा

लहान मुलं बऱ्याचदा चुका करून बसतात. अशावेळी लहान मुलांना ओरडल्याने ते आणखीनच बिघडून जातात. अशातच तुमचा स्वभाव तुमच्या मुलांच्या मानसिकतेवर वाईट प्रभाव पाडू शकतो. चला तर मग जाणून की, घेऊया राग कशा पद्धतीने कंट्रोल करायला हवा. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांची चांगले संस्कार देऊ शकता.

1. शिक्षा देण्यापासून वाचा :

लहान मुलांनी कोणतीही चुकी केली की, पालक (Parents) विचारपूस न करता त्यांना ओरडतात आणि लगेचच शिक्षा देण्यास सुरुवात करतात. परंतु यामुळे तुमची मुले बिघडू शकतात. अशावेळी तुम्ही तुमच्या मुलांना रागामध्ये शिक्षा अजिबात देऊ नका. सोबतच दीर्घ श्वास घेऊन आणि शांत राहून मॅटर सॉल्व्ह करा.

2. लहान मुलांचा दृष्टिकोन समजून घ्या :

लहान मुलं वेगवेगळया प्रकारची मस्ती करतात. अशातच त्यांचावर ओरडण्याआधी त्यांचा पॉईंट ऑफ व्युव जाणुन घेणे अत्यंत गरजेचे आहे. असं केल्याने तुम्हाला तुमच्या मुलांना (Kids) नीट समजवता येईल आणि मुलं सुद्धा केलेली चूक पुन्हा करणार नाहीत.

Parenting Tips
Child Care Tips : तुमचे मुलंही झोपेत अंथरुण ओले करते ? मग 'हे' घरगुती उपाय करुन पाहा

3. डोके शांत ठेवा :

काही पालक मुलांच्या चुकिवर आगीचा गोळा बनतात. ज्यामुळे मुलं भयभीत होतात. त्यामुळे मुलांच्या चुकीवर ओरडण्याधी स्वतःच डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

4. चुकी मान्य करा :

अनेक पालक मुलांसमोर चुका करतात आणि नंतर हसण्यावारी नेतात. अशातच मोठ्यांच पाहून लहान मुलं सुद्धा चुकी करतात. त्यामुळे घरामध्ये चुकी झाल्याबरोबर तुम्ही लगेचच माफी मागा. ज्यामुळे मुलांना चांगला मेसेज जाईल आणि लहान मुलं कमीत कमी चुकी करण्यावर जोर देतील.

Parenting Tips
Kids Health Tips : लहान मुलांसाठी फिडींग स्पून खरेदी करण्यापूर्वी 'या' काही गोष्टी लक्षात ठेवा!

5. चुकांमधून शिका :

चुकी झाल्यानंतर मुलांना ओरडण्याऐवजी त्यांना चुकीचं आणि बरोबर समजवून सांगा. ज्यामुळे मुलं त्यांच्या चुकीमधून शिकतील आणि पुन्हा ती चूक रिपीट करणार नाहीत. अशातच घाबरवून किंव ओरडण्याऐवजी तुम्ही तुमच्या मुलांना प्रेमाने समजावून सांगू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com