heart attack risk google
लाईफस्टाईल

Supplement Warning: 'या' 5 सप्लिमेंट्स खाताय? मग वेळीच सावध व्हा! वाढेल हार्ट अटॅक अन् लिव्हर फेल्युअरचा धोका

Heart Health: डॉक्टरांच्या संशोधनानुसार नायसिन, ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट, स्वीटनर्स आणि मल्टिव्हिटॅमिन्सचा अति वापर हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि लिव्हर फेल्युअरचा धोका वाढवू शकतो. तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.

Sakshi Sunil Jadhav

काही लोकप्रिय सप्लिमेंट्स हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि लिव्हर फेल्युअरचा धोका वाढवू शकतात.

नायसिन, ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट आणि झिरो-कॅलरी स्वीटनर्स सर्वात धोकादायक ठरू शकतात.

फ्थॅलेट्स असलेल्या कॅप्सूल्समुळे रक्तवाहिन्यांची जळजळ वाढते.

बऱ्याचदा काही आजार झाले की, आपण घरगुती उपचार करतो. मात्र काहीजण नॅचरल औषधं किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणारे प्रोडक्ट्स वापरतात. "नेचरल" नाव लावल्यामुळे काहीही असुरक्षित ठरत नाही, असा अनेकांचा समज असतो. मात्र संशोधनानुसार न्यूयॉर्कमधील माउंट सायनाय येथील कार्डिओलॉजिस्ट डॉ. इव्हान लेविन यांनी दिला आहे. त्यांच्या या गंभीर इशाऱ्यानंतर जगभरात वाढत असलेल्या वेलनेस आणि सप्लिमेंट्स उद्योगात खळबळ उडाली आहे.

दररोज लाखो लोक आपण आपले आरोग्य सुधारत आहोत असा विश्वास ठेवून व्हिटॅमिन्स, हर्बल कॅप्सूल्स आणि नेचरल पावडर्स घेतात. पण डॉ. लेविन यांच्या मते, काही लोकप्रिय सप्लिमेंट्स हार्ट अटॅक आणि लिव्हरवरच्या कार्यात अडथळे आणि शकतात. आणि अत्यंत गंभीर परिस्थितीत हार्ट अटॅक, लिव्हर फेल्युअर किंवा स्ट्रोक होऊ शकतो.

डॉ. लेविन यांनी इशारा दिलेल्या पाच धोकादायक सप्लिमेंट्समध्ये सर्वप्रथम नायसिन ( Niacin) व्हिटॅमिन B3 याचा समावेश आहे. ऊर्जा निर्मिती आणि नर्व्हस हेल्थसाठी आवश्यक असलेले नायसिन नैसर्गिकरीत्या मटण, मासे, नट्स आणि केळ्यात आढळतं. मात्र अनेक सप्लिमेंट्समध्ये याचे प्रमाण जास्त असतं. कधी कधी 2000 ते 6000 mg पर्यंत, जे सुरक्षित मर्यादेपेक्षा अनेकपट जास्त आहे. यामुळे यकृताची सूज, हेपॅटायटीस आणि गंभीर परिस्थितीत लिव्हर फेल्युअर होऊ शकते. 2024 मधील नेचर मेडिसीनच्या अभ्यासानुसार जास्त नायसिनमुळे हृदयविकाराचा धोका दुप्पट होऊ शकतो.

दुसरे धोकादायक सप्लिमेंट म्हणजे ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट( Green Tea Extract). ग्रीन टी पिणं सुरक्षित असलं तरी त्याचा कन्सन्ट्रेटेड एक्स्ट्रॅक्ट लिव्हरला हानी पोहोचवू शकतो. यात असणाऱ्या EGCG या कंपाऊंडचे प्रमाण जास्त असते जे लिव्हरचे एन्झाइम्स वाढवून गंभीर जखम करु शकते. युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटीने 800 mg पेक्षा जास्त डोस धोकादायक असल्याचे सांगितले आहे.

तिसऱ्या क्रमांकावर एरिथ्रिटॉल आणि झायलिटॉल हे झिरो-कॅलरी स्वीटनर्स येतात. ‘किटो’ प्रोडक्ट्स आणि शुगर-फ्री खाद्यपदार्थांमध्ये यांचा भरपूर वापर होतो. मात्र 2023–2024 च्या अनेक अभ्यासानुसार हे स्वीटनर्स रक्तातील प्लेटलेट्स चिकट बनवतात, ज्यामुळे रक्तगाठी तयार होतात आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.

चौथ्या क्रमांकावर सॉफ्ट जेल कॅप्सूल्समुळे शरीरात जाणारे फ्थॅलेट्स धोकादायक ठरतात. अनेक मल्टिव्हिटॅमिन्स आणि मेडिकल जेल कॅप्सूल्समध्ये हे प्लास्टिकसाठी वापरले जाणारे रसायन असते. शरीरात गेल्यावर हे रक्तवाहिन्यांची जळजळ वाढवतात आणि हृदयरोगाचा धोका वाढवतात.

पाचवा आणि सर्वात मोठा मुद्दा म्हणजे मल्टिव्हिटॅमिन्सचा अति वापर. एकाच वेळी अनेक व्हिटॅमिन्सचे जास्त प्रमाण घेतल्यास ते शरीरात एकमेकांशी प्रतिक्रिया देतात आणि हानी करतात. व्हिटॅमिन A आणि आयर्नचा अतिरेक लिव्हर ओव्हरलोड करतो, तर व्हिटॅमिन E चे जास्त प्रमाण रक्त पातळ करतं आणि हेमोरेजिक स्ट्रोकचा धोका वाढवतं.

तज्ज्ञांचा सल्ला असा की सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, शक्यतो पोषणाचे स्त्रोत अन्नातूनच घ्यावेत. लेबल्स नीट वाचावीत आणि लिव्हर-हृदय तपासणी नियमित करावी.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics : बिहारमधील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ; मुलगी रोहिणी आचार्य यांनी घेतला मोठा निर्णय

Garlic Pickle Recipe: चटपटीत, चमचमीत लसूण लोणचं घरी कसं बनवायचं?

Motichur Ladoo Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असले तर घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी मोतीचूर लाडू

Maharashtra Live News Update: भायखळ्यात इमारत बांधकाम दुर्घटनेदरम्यान दोन मजुरांचा मृत्यू

Ind vs SA 1st Test : भारताचा दक्षिण आफ्रिकेला जोरदार झटका, वर्ल्ड चॅम्पियन संघाचा तिसऱ्या दिवशीच सुपडासाफ करणार

SCROLL FOR NEXT