Health Risk For Women  Saam tv
लाईफस्टाईल

Health Risk For Women : वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांना या गंभीर आजारांचा धोका! कशी घ्याल काळजी

5 Most Common Female Health Problems Over 40 : वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या शरीरात झपाट्याने बदल होत असतात. शारीरिक ताण, हार्मोनल बदलांमधून जावे लागते. अशावेळी स्त्रियांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यायला हवी.

कोमल दामुद्रे

Women's Health After 40 :

जसं जसं वय ओलांडून लागते तसं तसं आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वाढत्या वयानुसार प्रत्येकाला आपल्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करणे जास्त गरजेचे आहे.

वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या (Women) शरीरात झपाट्याने बदल होत असतात. शारीरिक ताण, हार्मोनल बदलांमधून जावे लागते. अशावेळी स्त्रियांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यायला हवी.

जनरल फिजिशियन डॉ. टॉम जेनकिन्स म्हणतात की, महिलांना असे वाटते की, वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आपण फिट आहोत. नंतर अचानक आरोग्याशी संबंधित काही समस्या येऊ लागतात. वाढत्या वयात आरोग्याची नीट काळजी घेतली नाही तर काही गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. जाणून घेऊया त्या आजारांबद्दल (Disease)

1. ऑस्टिओपोरोसिस

ऑस्टिओपोरोसिसचा धोका स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात असतो. ज्यामुळे रजोनिवृत्तीच्या वेळी हाडे कमकुवत होतात. यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हाडे कमकुवत असतील तर वेळीच कॅल्शियम असणाऱ्या पदार्थांचे सेवन करा.

2. स्तनाचा कर्करोग

मिळालेल्या अहवालानुसार दर २८ पैकी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाला सामोरे जावे लागते. हा कर्करोग (Cancer) स्त्रियांमधील कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. परंतु, वेळीच काळजी घेतली तर यावर मात करता येते.

3. गर्भाशयाचा कर्करोग

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने ग्रस्त बहुतेक महिलांचे वय हे ३५ ते ४४ वयोगटातील आहे. या आजाराचे निदान करण्यासाठी दर तीन वर्षांनी चाचणी करायला हवी. हा आजार गुद्ववार किंवा लैंगिक संबंधातून एखाद्या व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत पसरु शकतो.

4. अशक्तपणा

WHO च्या मते, जगभरातील १५ ते ४९ वयोगटातील ३० टक्के स्त्रिया अॅनिमियाने ग्रस्त आहेत. शरीरात एनर्जीची कमतरता, श्वासोच्छवासाचा त्रास, हृदयाची गती, त्वचा पिवळी पडणे अशी अनेक कारणे आहेत. यासाठी वेळोवेळी तुमचे रक्त तपासा.

5. कोलेस्टेरॉल

उच्च कोलेस्टेरॉल किंवा उच्च रक्तदाबामुळे वयाची चाळशी ओलांडल्यानंतर हृदयविकाराचा धोका वाढू लागतो. जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर जास्त धोका असतो. यासाठी नियमितपणे कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाबाची तपासणी करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi : बॅनर फाडल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; फिर्याद देणाऱ्याचा कारनामा उघड, चारजण ताब्यात

Trambkeshwar Temple : कालसर्प पूजा ॲपच्या आडून भाविकांची लूट | VIDEO

Maharashtra Live News Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जनआंदोलन

Post Office Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Farmer : आठ महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; पश्चिम विदर्भात सर्वात मोठा आकडा आला समोर

SCROLL FOR NEXT