Shreya Maskar
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परबचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने आपल्या कॉमेडी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
नुकतेच शिवाली परबने हटके फोटोशूट केले आहे. त्याची पोस्ट तिने सोशल मीडियावर केली आहे. तिच्या लूकने इंटरनेटवर कहर केला आहे.
शिवालीने पांढऱ्या रंगाचे शर्ट त्यावर काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. जॅकेटवर पांढऱ्या रंगाच्या लाइन आहेत. अशाच पद्धतीचा तिने स्कर्ट परिधान केला आहे.
पायात शूज, गोल्डन ज्वेलरी, हातात वॉच, केसांची पोनी आणि मिनिमल मेकअप करून तिने हा हटके लूक पूर्ण केला आहे. तिच्या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
शिवालीच्या फोटोंवर एका चाहत्याने कमेंट केली की, "तुम्हारी अदा भी क्या खूबसूरत है, हर एक लम्हा दिल को छू जाती है..."
तर इतर चाहते देखील शिवालीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहे. उदा. "कमाल आहेस तू", "सुंदर", "किती गोड", "लेडी डॉन", "मस्त दिसतेस"
शिवाली परबला कल्याणची चुलबुली म्हणून ओळखले जाते. लहानांपासून- मोठ्यापर्यंत सर्वांची ती आवडती आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने चित्रपटातही काम केले आहे.
अलिकडेच शिवाली परब कॉरिओग्राफर रुपेश बनेसोबत भन्नाट डान्स व्हिडीओ बनवत आहे. ज्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.