Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी सध्या 'ठरलं तर मग!' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर 8:30 वाजता पाहायला मिळते.
नुकतेच जुई गडकरीने आपल्या हटके लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा हटके , स्टायलिश लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
जुई गडकरीच्या नवीन लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने डार्क ब्राउन रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
चेक्स शर्ट, पॅन्ट , जॅकेट आणि डोक्यावर टोपी घालून तिने हा हटके लूक पूर्ण केला आहे. ज्याचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.
मोकळे केस, मिनिमल मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या डोळ्यात वेगळी जादू आणि चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळत आहे.
जुई गडकरीच्या फोटोंवर चाहत्याकंडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत आहे. चाहते तिच्या लूक आणि सौंदर्याचे कौतुक करत आहेत. क्यूट, मस्त, सुंदर दिसतेस अशा कमेंट्स करत आहेत.
जुई गडकरीने हा हटके लूक 'आता होऊ दे धिंगाणा 4' साठी केला आहे. जुई गडकरी होऊ दे धिंगाणा या कॉमेडी शोमध्ये आली आहे.