Kidney Damage Symptoms google
लाईफस्टाईल

Kidney Damage Symptoms: सकाळी उठल्यावर हे ५ बदल जाणवतायेत?किडनी खराब होण्याची ही आहेत गंभीर लक्षणं, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

Early Signs of Kidney Disease : बदलत्या जीवनशैलीमुळे तुम्हाला खूप गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. किडनी हा शरीरातला महत्वाचा भाग असतो. जर त्यात बिघाड झाला तर भविष्यात आणखी धोके वाढू शकतात.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या जीवनशैलीत अनेकजण त्यांच्या सोयीनुसार बदल करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यात खाण्याच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. बाहेरचं खाणं इतकं वाढलय की घरच्या खाण्याची चवच लोक विसरत चाललेत. पण याने तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

तुमच्या बदलत्या लाइफस्टाइलचा आणि खाण्यापिण्या परिणाम तुमच्या किडनीवर होतो. तेव्हा तुम्हाला अनेक लक्षणं हळूहूळ जाणवतात. पण ही लक्षणं कधीही जाणवत नाहीत, तर सकाळी उठल्यावर तुम्हाला जाणवू शकतात.

किडनीचं काम हे शरीरातले विषारी पदार्थ, जास्तीचं पाणी आणि सोडियम बाहेर टाकण्याचं असतं. पण किडनी नीट काम करत नसेल तर हे पदार्थ शरीरात तसेच साचतात आणि त्याचा परिणाम विविध स्वरूपात दिसून येतो. यात सुरुवातीला सकाळी उठल्यानंतर चेहराच्या किंवा डोळ्यांच्या आजुबाजूच्या भागात सूज दिसते. हे किडनी खराब होण्याचं प्रमुख लक्षण मानलं जातं.

सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला उलटी सारखं वाटत असेल तर हे लक्षण सुद्धा किडनी खराब होण्याचं लक्षण मानलं जातं. कारण किडनीचं काम नीट होत नसेल तर तुमच्या पोटातली घाणही साफ होत नाही. म्हणूनच तुम्हाला ही लक्षणं जाणवतात.

तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या लघवीला जायची सवय असेल तर, तुमच्या लघवीत जास्त फेस दिसेल, रंग गडद पिवळा दिसेल तसेच लघवीत रक्त दिसणं ही गंभीर लक्षणं असू शकतात. काहींना सकाळी उठल्यानंतर कंबरदुखी किंवा पाठदुखीचा त्रास जाणवतो. तसेच त्वचा कोरडी पडणं, खाज सुटणं किंवा त्वचेवर जळजळ होणं ही लक्षणंही किडनी खराब झाल्याचीच असतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

टीप: ही माहिती सामान्य जागरूकतेसाठी असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. साम टिव्ही याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT