Good Luck Plants  Saam Tv
लाईफस्टाईल

Good Luck Plants For Home: घरात लावा तुळशीसहित ३ रोपटे; घरातील सदस्यांचं नशीब उजळेल, गवसेल भरारीचा मार्ग

Vishal Gangurde

Good Luck Plants For Home:

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपट्याला पवित्र स्थान आहे. ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते, त्यांच्या घरात धनधान्याची कमी नसते. तुळशीबद्दल धार्मिक ग्रंथात विस्तृत लिहिण्यात आलं आहे. याच तुळशी आणि इतरही धार्मिक मान्यताप्राप्त रोप, वनस्पतींबद्दल माहिती जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

एका मीडिया रिपोर्टनुसार , ज्यांच्या घरात तुळशीचं रोपटं असतं, त्यांच्या घरी लक्ष्मी आरास करते. भगवान विष्णु यांना तुळशी अतिप्रिय आहे. तुळशीच्या रोपट्यामुळे अनेक लाभ होतात. यामुळे घरात सुख-समृद्धी येते. तुळशीसहित काही अन्य रोपटेही घरात सुखसमृद्धीसाठी लावू शकता.

केळीचं रोप

ज्योतिष शास्त्रानुसार, गुरवारी दिवसा केळीचं रोप लावल्यास घरातील नकारत्मक उर्जा दूर जाते. त्याबदल्यात घरात सकारात्मक उर्जेचा संचार वाढतो. असं मानलं जातं की, केळीच्या रोपात भगवान विष्णुचा वास असतो. गुरुवारी केळीच्या रोपाची पूजा केल्याने अनेक लाभ होतात. केळीच्या रोपाची पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. ( Banana House )

शमीची वनस्पती

ज्योतिष शास्त्रानुसार, घरात तुळशीसहित शमीची वनस्पती लावणे देखील शुभ मानलं जातं. शमी वनस्पतीचा संबंध थेट शनिदेवाशी जोडला जातो. यामुळे शनिवारी शमी वनस्पतीची पूजा करणं शुभ मानलं जातं. धार्मिक मान्यतानुसार, शमीच्या वनस्पतीची पूजा केल्याने सुख-समृद्धी लाभते. (shami tree)

काळ्या धोत्र्याचं रोपटं

धार्मिक मान्यतेनुसार, काळ्या धोत्र्याच्या रोपात भगवान शिव यांचा वास असतो. घरात काळ्या धोत्र्याचं रोपटं लावल्यास घराची भरभराट होते. वास्तू शास्त्रानुसार, घरात काळ्या धोत्र्यांचं रोपटं लावल्याने भगवान शिव यांची कृपा वाढते. काळ्या धोत्र्याचं रोपटं मंगळवारी लावलं पाहिजे. (Kala Dhatura Plant)

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT