Menopause Risk Stroke  Saam Tv
लाईफस्टाईल

Menopause Risk Stroke : धक्कादायक! १० पैकी ४ महिलांना रजोनिवृत्तीमुळे स्ट्रोकचा धोका, संशोधनातून खुलासा

Could Stroke Lead To Early Menopause : आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त शहरातील काही रुग्णालयात सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून असे कळाले की, १० पैकी चार महिलांना रजोनिवृत्तीमुळे पक्षाघाताचा धोका वाढतो याविषयी माहिती नाही.

कोमल दामुद्रे

Can A Stroke Cause Menopause :

आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त शहरातील काही रुग्णालयात सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून असे कळाले की, १० पैकी चार महिलांना रजोनिवृत्तीमुळे पक्षाघाताचा धोका वाढतो याविषयी माहिती नाही.

शहरातील मोठ्या संख्येने महिलांना (Women) रजोनिवृत्ती, नैराश्य आणि मायग्रेन पक्षाघाताचा धोका वाढतोय. ज्यात देशातील मृत्यूच्या पाच प्रमुख कारणांपैकी एक आहे. याची माहिती महिलांना नसल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे.

फोर्टिस समूहाच्या डॉक्टरांच्या मते, दोन महिन्याच्या सर्वेक्षणात ८५ टक्के लोकांना स्ट्रोक, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब यांच्या संबंधित माहिती मिळाली होती. परंतु, स्तनपान करणाऱ्या महिलांना याविषयी माहिती नव्हते. रजोनिवृत्ती, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक सामान्य आहे. असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

५००० पैकी ५४ टक्के महिलांनी असे सर्वेक्षणात असे सांगितले की, स्तनपानामुळे स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो. तर ४६ टक्के लोकांनी सांगितले की, दोघांमध्ये कोणाताही संबंध नाही. तर ८४ टक्के लोकांनी गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब असणे ही सामान्य गोष्ट मानली आहे. तर २० टक्के लोकांना गर्भनिरोधक गोळ्यांशी देखील कोणताही संबंध दिसला नाही.

न्यूरोलॉजिस्ट डॉ राकेश लल्ला म्हणाले की, संशोधनातून असे समजून आले की ज्या नवोदित माता आपल्या बाळांना स्तनपान करतात त्यांना स्ट्रोकचा धोका कमी होतो. परंतु, याचे कोणतेही कारण अद्याप मिळालेले नाही. असे म्हटले जात आहे की, स्तनपान करणाऱ्या मातांच्या चयापचय प्रक्रियेत वाढ झाल्यामुळे गर्भधारणेदरम्यान जमा होणारा चरबीचा साठा वेगाने कमी होतो.

तणाव (Stress), लठ्ठपणा आणि बदलेल्या जीवनशैलीव्यतिरिक्त (Lifestyle) स्त्रियांना येणाऱ्या स्ट्रोकची कारणे वेगळी असू शकतात. मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटले न्यूरोलॉजिस्ट डॉ. राजेश बेन्नी म्हणाले ५० नंतर रजोनिवृत्तीला पोहोचलेल्या स्त्रियांच्या तुलनेत लवकर रजोनिवृत्त स्त्रियांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो.

सर्वेक्षणात ६३ टक्के लोकांनी मान्य केले की रजोनिवृत्तीनंतर १० वर्षांनी स्त्रियांमध्ये स्ट्रोकचा धोका दुप्पट होतो तर ३७ टक्के लोकांच्या मते रजोनिवृत्तीमुळे स्ट्रोकचा धोका येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होम लोन, कार लोन झालं स्वस्त; नवरात्रीआधी 'या' बँकेने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

iPhone 17 Series launch: खास डिझाइन, आकर्षक फिचर्स, iPhone 17 आज येतोय, किंमत किती असणार? VIDEO

Kajal Aggarwal : काजल अग्रवालच्या मृत्यूची अफवा, नेमकं काय आहे सत्य?

Zilha Parishad School : झेडपीच्या शाळेचा चेहरामोहरा बदलला, दौंडमधील मेमानवाडीच्या शाळेची जोरदार चर्चा, मुलं जर्मन बोलतात... वाचा

SCROLL FOR NEXT