Women's Day 2024 : स्त्रियांमध्ये कर्करोगाविषयीच्या जनजागृतीची आवश्यकता, डॉक्टरांनी दिला सल्ला

Women's Health Tips : स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, एंडोमेट्रियल , वल्वर यांसारख्या कर्करोगांचे प्रमाण वाढले आहे. या कर्करोगाचे वेळीच निदान आणि उपचार गरजेचे आहे.
Women's Day 2024, Women's Health Tips
Women's Day 2024, Women's Health TipsSaam Tv
Published On

Cancer Awareness in Women's :

बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, धूम्रपान तसेच मद्यापानासारख्या वाईट सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव यासारखे घटक स्त्रीरोगविषयक कर्करोगास कारणीभूत ठरतात.

स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, एंडोमेट्रियल , वल्वर यांसारख्या कर्करोगांचे प्रमाण वाढले आहे. या कर्करोगाचे वेळीच निदान आणि उपचार गरजेचे आहे.

वेळोवेळी तपासणी केली असता ज्यांना कर्करोगाचा अधिक धोका आहे अशा व्यक्तींना कर्करोगाचे निदान करण्यास नक्कीच फायदा (Benefits) होतो. कर्करोगास (Cancer) रोखण्यासाठी वेळीच निदान व उपचार आवश्यक आहे.

Women's Day 2024, Women's Health Tips
Women's Day 2024 : 'मेरी सहेली' योजना काय? महिलांना प्रवास करताना कसा होईल फायदा

25-55 वयोगटातील महिलांमध्ये स्त्रीरोगविषयक कर्करोगाचे वेळेवर निदान, उपचार आणि प्रतिबंध गरजेचे आहे. कर्करोग हे स्त्रियांच्या प्रजनन प्रणालीवर देखील परिणाम करतात. पॅप स्मीअर आणि पेल्विक एक्झामिनेशन यासारख्या चाचण्यांमुळे वेळीच कर्करोगाचे निदान शक्य होते. ज्यामुळे कर्करोगांवर यशस्वी उपचार करता येणे शक्य आहे.

कर्करोगाच्या प्रकारानुसार त्यावर उपचार केले जातात. प्रत्येक रुग्णासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी तयार केल्या जाऊ शकतात. नियमित व्यायामासह निरोगी जीवनशैली (Lifestyle) बाळगणे, फळे आणि भाज्यांनी युक्त संतुलित आहाराचे सेवन करणे, अल्कोहोलचे सेवन मर्यादित करणे आणि तंबाखूजन्य पदार्थ टाळणे यामुळे या प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो असे डॉ सुंदरम पिल्लई(सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, झायनोवा शाल्बी हॉस्पिटल यांनी स्पष्ट केले.

Women's Day 2024, Women's Health Tips
International Women's Day 2024: महिलांनो, ८ मार्चला भारतातील या ठिकाणी फिरा फुकटात, जाणून घ्या संपूर्ण माहिती

स्त्रीरोगविषयक कर्करोग हा स्त्रीची प्रजनन प्रणाली आणि जननेंद्रियांमध्ये विकसित होतो. यामध्ये योनी, गर्भाशय मुख, गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा समावेश असतो. वाढत्या वयानुसार स्त्रीरोग कर्करोगाची शक्यता वाढते. स्त्रीरोगविषयक कर्करोगाचे विविध प्रकार आहेत ज्याबद्दल महिलांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) मुळे उद्भवणारा कर्करोग आहे. कर्करोग प्राथमिक अवस्थेत शोधण्यासाठी स्क्रीनिंग पद्धती उपलब्ध आहेत. या कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी लस देखील उपलब्ध आहे ज्यामुळे या कर्करोगापासून संरक्षण मिळते. एंडोमेट्रियल लेयरमध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ झाल्यास एंडोमेट्रियल कर्करोग होतो. जेव्हा महिला अधिक रक्तस्त्रावाची तक्रार करतात तेव्हा काहीवेळा हे प्रीकॅन्सरचे लक्षण असू शकते.

Women's Day 2024, Women's Health Tips
Health Risk For Women : वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांना या गंभीर आजारांचा धोका! कशी घ्याल काळजी

रजोनिवृत्तीनंतर होणारा कोणत्याही प्रकारचा रक्तस्त्राव धोक्याची घंटा देतो. वल्व्हर कर्करोग हा जननेंद्रियावर परिणाम करतो, विशेषत: वाढत्या वयात हा कर्करोग पहायला मिळतो. तुम्हाला सतत खाज येत असल्यास किंवा खाली त्वचेवर कोणतेही नवीन बदल दिसल्यास वैद्यकीय मदत घ्यायला विसरु नका.

स्त्रीच्या गर्भाशयात पेशींची असामान्य वाढ होते तेव्हा गर्भाशयाचा कर्करोग होतो. यापैकी काही कर्करोग अनुवंशिकरित्या आढळून येतात. स्तन, एंडोमेट्रियल तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांनी वेळोवेळी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा सल्ला डॉ. रोहिणी खेरा भट्ट (प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, लॅपरोस्कोपिक सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) यांनी स्पष्ट केले.

Women's Day 2024, Women's Health Tips
Women Health : महिलांनो, गर्धधारणेसाठी IVF चा विचार करताय? योग्य वय किती? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

25-45 वयोगटातील महिलांमध्ये वाढते कर्करोगाचे प्रमाण ही एक चिंताजनक बाब ठरत आहे. एंडोमेट्रियल कर्करोग हा स्त्रियांमध्ये आढळून येणाऱ्या प्रमुख कर्करोगांपैकी एक आहे. हा गर्भाशयाच्या अस्तरात विकसित होतो असून बहुतेकदा स्त्रियांना त्यांच्या रजोनिवृत्तीनंतरच्या या काळात याचे निदान होते. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे सर्व वयोगटातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येते.

हा कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात शोधणे अत्यंत अवघड असल्याने कर्करोगामुळे मृत्यूदरात वाढ झाल्याचे नोंदविले जात आहे. आनुवंशिकता आणि वाढते वय याचबरोबर जीवनशैलीची निवड आणि पर्यावरणीय घटकांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. लठ्ठपणा, धूम्रपान आणि बैठी जीवनशैली यांचे वाढते प्रमाण हे कर्करोगांच्या वाढीस कारणीभूत ठरत आहे.

लक्षणे आणि स्क्रिनिंग पद्धतींबद्दल जागरूकता नसल्यामुळे कर्करोगाच्या निदानात विलंब होतो. महिलांना कर्करोगाची लक्षणे आणि नियमित तपासणीस बाबत माहिती देणे, त्याबाबत जमजागृती करणे हे वेळीच निदान आणि उपचारासाठी फायदेशीर ठरते असे डॉ तेजल गोरासिया( ब्रेस्ट अँड गायनॅक ऑन्को सर्जन, ओन्को लाईफ कॅन्सर सेंटर, चिपळूण) यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com