Women's Day 2024 : 'मेरी सहेली' योजना काय? महिलांना प्रवास करताना कसा होईल फायदा

Meri Saheli Yojana : महिलांना सुरक्षा देण्यासाठी आरपीएफने देशभरात मेरी सहेली योजना सुरु केली. या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार? हा लाभ कसा घेता येईल? जाणून घेऊया सविस्तर
Women's Day 2024, Meri Saheli Yojana
Women's Day 2024, Meri Saheli YojanaSaam Tv
Published On

Meri Saheli Scheme :

महिलांना सुरक्षित आणि चांगला प्रवास मिळावा यासाठी मध्य रेल्वेने 'मेरी सहेली' अभियान सुरु केले आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण अधिक वाढले आहे. ट्रेनने किंवा बसने प्रवास करताना त्या पूर्णपणे सुरक्षित नाही. यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. त्यापैकी एक मेरी सहेली योजना.

ट्रेनने (Train) प्रवास करणाऱ्या महिलांना (Scheme) या योजनेचा लाभ घेता येईल. महिलांना सुरक्षा देण्यासाठी आरपीएफने देशभरात मेरी सहेली योजना सुरु केली. या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार? हा लाभ कसा घेता येईल? जाणून घेऊया सविस्तर

या योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळणार आहे. ट्रेनमधून एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना याचा लाभ घेता येईल. बरेचदा ट्रेनमध्ये महिला एकट्या दिसल्या की, त्यांच्यासोबत चुकीच्या घटना घडतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मेरी सहेली योजनेतंर्गत ट्रेनमध्ये एकटी महिला प्रवास (Travel) करत असेल तर त्यांना विशेष संरक्षण देण्यात येईल.

Women's Day 2024, Meri Saheli Yojana
International Women's Day 2024: महिलांनो, ८ मार्चला भारतातील या ठिकाणी फिरा फुकटात, जाणून घ्या संपूर्ण माहिती

1. कसा होईल या योजनेचा फायदा?

मेरी सहेली योजनेच्या या संघात फक्त महिला वर्ग असतील. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या इतर महिलांची काळजी फक्त महिलाच घेतील. ही टीम महिला कोणत्या ठिकाणी जात आहे. तसेच त्यांना कुणी त्रास देत आहे का? याशिवाय त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल. तसेच महिलांना प्रत्येक रेल्वे स्थानकावर वेगवेगळी टीम मिळू शकते. जर काही चुकीची घटना घडली तर तात्काळ कारवाईसाठी RPSF एस्कॉर्ट कर्मचारी आणि RPF गाड्या रेल्वेस्टेशनवर उपलब्ध राहातील.

Women's Day 2024, Meri Saheli Yojana
Somnath Mandir Tour Guide: महाशिवरात्रीला सोमनाथ मंदिराचे दर्शन घ्या, तिकीट खर्च किती? कसे कराल प्लानिंग, जाणून घ्या सविस्तर

2. अडचण आल्यास या क्रमांकावर संपर्क साधा

महिला प्रवाशांना ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास १८२ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करु शकतात. प्रवासादरम्यान अडचण किंवा गैरसोय झाल्यास या क्रमांकावर संपर्क साधू शकते. २०२० च्या सप्टेंबरमध्ये दक्षिण पूर्व रेल्वेने याविषयीचा निर्णय घेतला. यासाठी महिला आरपीएफ जवानांची टीम तयार करण्यात आली. मेरी सहेली योजनेमुळे महिलांना बिनधास्तपणे एकट्याने आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com