How To Set Data Limit Speed  Saam Tv
लाईफस्टाईल

How To Set Data Limit Speed : फुल ऑन मजा! दिवसभर कितीही युज करा डेटा,संपणारच नाही; फक्त ही एक सेटिंग ऑन करा

कोमल दामुद्रे

Internet Speed : प्रवासात किंवा फावल्या वेळेत आपला सखा सोबती कोणी असेल तर तो आपला फोन. यावेळी गाणी ऐकणे, रिल्स पाहाणे, चॅटिंग करणे किंवा स्क्रोल करणे यांसारख्या गोष्टी आपण फोनवर करत असतो. परंतु, लिमिटेड डेटामुळे कधी कधी ही प्रवासातील मजा निघून जाते.

प्रत्येक वापरकर्त्याला स्मार्टफोनमध्ये इंटरनेटची आवश्यकता असते. मात्र इंटरनेटबाबत वापरकर्त्याची गरज कमी-अधिक असू शकते. घर आणि ऑफिसमध्ये वायफायच्या सुविधेमुळे, प्रत्येक वापरकर्त्याची इच्छा आहे की फोनमध्ये नेटसाठी स्वस्त रिचार्ज पॅक करायला हवा.

परंतु कधी कधी नेट पॅक काही वेळा (Time) आधीच संपतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला फोनचा डेटा दिवसभर चालवायचा असेल, तर तुम्ही फोनच्या काही सेटिंग्जची मदत घेऊ शकता. फोनमध्ये डेटाचा (Data) वापर कसा करायचा व तो सेव्ह कसा करायचा हे जाणून घेऊया

1. डेटा सेव्ह करण्यासाठी या गोष्टी करा

  • तुम्ही फोनमधील डेटा सेव्हर पर्याय ऑन करू शकता

  • फोनमध्ये डेटा मर्यादा सेट केली जाऊ शकते

  • काही अॅप्ससाठी डेटा मर्यादा सेट करू शकते.

2. Android फोनचा डेटा सेव्हर पर्याय काय आहे?

जेव्हा तुम्हाला असे वाटेल की डेटा खूप जास्त वापरला गेला आहे आणि आणखी काही तास चालवला पाहिजे तेव्हा तुम्ही हा पर्याय ऑन करू शकता. डेटा सेव्हरचा पर्याय फोनमधील (Phone) डेटाचा वापर थांबवण्यासाठी काम करतो.

तुम्ही वापरत नसलेल्या अॅप्स आणि सेवांसह बॅकग्राउंडला डेटा वापरला जात नाही. याशिवाय, डेटा सेव्हर पर्यायासह डेटा हॉटस्पॉट देखील बंद आहे. ते करण्यासाठी सेटिंग्ज > मोबाइल नेटवर्क > डेटा वापर > डेटा बचतकर्ता ही ट्रिक फॉलो करा

3. फोनवर डेटा मर्यादा सेट करा

फोनमध्‍ये डेटा लिमिट सेट करा. एका मर्यादेनंतर इंटरनेट स्पीड कमी होत जाते. अशावेळी, जाणूनबुजून किंवा नकळत, आपण इतर गोष्टींमधून डेटा जतन केला जाऊ शकतो. यासाठी सेटिंग्ज > मोबाइल डेटा > डेटा वापर > डेटा मर्यादा ही ट्रिक फॉलो करा. या ऑपशनवरुन डेली आणि आठवड्याचा डेटा मर्यादा सेट केली जाऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT