भूमी पेडणेकरने तिच्या कारकिर्दीत कमी सिनेमे केले असतील, पण तिने जे काही केले ते खूप गाजले. भूमीनेही त्या सिनेमांद्वारे इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं. वजन कमी केल्यानंतर भूमीने एथनिक, वेस्टर्न, मिनी ड्रेस, कटआउट ड्रेस, मिनी ड्रेस घालण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच भूमीने निळ्या रंगात अनोख्या स्टाईलमध्ये साडी घातली होती, त्या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
निळ्या रंगाची साडी
भूमीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने कॅप्शन दिले आहे, “साडीत सर्वात सुंदर” फोटोंमध्ये, भूमीने शिमोना अग्रवाल ब्रँडच्या लेबलच्या संग्रहातील निळ्या रंगाची साडी घातली होती. भूमीची ६ यार्डची साडी क्रेप फॅब्रिकची होती. त्याच्याबरोबर मॅचिंग ऑफ-शोल्डर ब्लाउज होता ज्यामध्ये एक अनोखा ड्रेप होता ज्यामुळे ती हटके लूक मध्ये दिसत होती. भूमी ने साडीचा पदर गळ्याभोवती सुंदर पद्धतीने घातला होता ज्यामुळे पारंपारिक साडीला थोडा वेगळा लूक आला होता.
स्टाइलिंग आणि ॲक्सेसरीज
या लूकसाठी भूमीचे स्टाइलिंग सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट मनीषा मेलवानी यांनी केले आहे. भूमीने आउटफिटसोबत किमान ॲक्सेसरीज घातल्या होत्या. सर्वात आकर्षक गोष्ट होती तिचे चांदीचे ब्रेसलेट.
मेकअप आणि हेयर स्टाइल
मेकअप आर्टिस्ट सोनिकने भूमीचा मेकअप केला होता. तिने भूमीचा लूक न्यूड आयशॅडो, विंग्ड आयलायनर, मस्करा कोटेड लॅशेस, ब्लश गाल, ग्लोइंग हायलाइटर आणि न्यूड लिपस्टिकसह पूर्ण केला. हेअर स्टायलिस्ट सँकी एव्हर्सने भूमीचे केस हळूवारपणे कुरळे केले होते आणि ते मोकळे सोडले होते.
Edited by - Archana Chavan