Jayant Patil : निवडणुकीची पद्धत बदलली, आमिषाला बळी पडू नका; जयंत पाटील यांचा निशाणा

Latur News : आमचे सरकार आल्यास महालक्ष्मी योजना आणणार आहोत. पिक विमा सारखे प्रश्न सोडणार आहोत.
Jayant Patil
Jayant PatilSaam tv
Published On

संदीप भोसले 

लातूर : निवडणुकीची पद्धत बदलली आहे. शेवटच्या टप्प्यात पैसे देतात आणि मतदान करा अशी विनंती करत असतात. तुम्ही कशाला ही बळी पडू नका. त्यामुळे तुमच्या मतदारसंघाचा विकास करून घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या; असे आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

लातूर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कि आमचे सरकार आल्यास महालक्ष्मी योजना आणणार आहोत. पिक विमा सारखे प्रश्न सोडणार आहोत. किरकोळ हजरा दोन हजार रूपये घेऊन मतदान करण्यापेक्षा आपल्या सोयाबीनला भाव देणाऱ्या महाविकास आघाडीच्या मागे रहा.

Jayant Patil
Priyanka Gandhi : गाडीचे सारथ्य करणाऱ्या तरुणासाठी प्रियंका गांधी विमानतळावर थांबल्या; फोटो काढला अन् झाल्या मार्गस्थ

विरोधात बोलण्याची हिंमत नाही 

महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शिवाय सध्या महागाई बेरोजगारी वाढली आहे. अनेक उद्योग गुजरातला गेले आहेत. पण त्याच्या विरोधात बोलायची हिंमत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये नाही.

Jayant Patil
Sambhajinagar News : बनावट विदेशी मद्य तयार करणाऱ्या एकास घेतले ताब्यात; १३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

क्षणिक फायद्यासाठी गद्दारी 

क्षणीक फायद्यासाठी शरद पवार यांच्याशी गद्दारी केली आणि स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्याचे म्हणत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या आमचं घड्याळ चोरीला गेले असल्याचे देखील ते म्हणाले. तर अमित शाह सांगत आहेत कि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार. पण मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता म्हणत आहेत. मी माघार घेत आहे. पण त्यांची संख्या वाढल्यास तेच मुख्यमंत्री होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com