Ghee With Hot Water Saam Tv
लाईफस्टाईल

Ghee With Hot Water : कोमट पाण्यात तूप मिक्स करुन प्या, वजन कमीकरण्यासोबत इतर अनेक फायदे

Health Tips : तूप ही अशी गोष्ट आहे जी जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात वापरली जाते.

Shraddha Thik

2 Teaspoon Ghee With Warm Water :

तूप ही अशी गोष्ट आहे जी जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात वापरली जाते. साधारणपणे तूप हे चपाती लावून आणि डाळीत घालून खाल्ले जाते. तूप हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही घरातील मोठ्यांकडून अनेकदा ऐकले असेल की तूप खाल्याने रूप येते. तूपाचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे.

जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त तूप सेवन केले, तर तुम्हाला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. तुपात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ईसह फॅट विरघळणारे जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. जे शरीराला अनेक फायदे (Benefits) देतात. चला तर मग जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने काय फायदा होतो आणि का करावे.

तुपाचे काय फायदे आहेत

पचन -

तुपामध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात जे पचनासाठी खूप चांगले मानले जातात. कोमट पाण्यात तूप टाकून तुम्ही रोज सकाळी याचे सेवन करू शकता.

लठ्ठपणा -

वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यात (Water) 2 चमचे तूप मिसळून सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करू शकता. यामुळे चरबी वितळण्यास मदत होऊ शकते.

हाडे -

दररोज तुपाचे (Ghee) सेवन केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते. तुम्ही ते सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात घेऊ शकता किंवा जेवणाच्या वेळी भातावर किंवा चपातीवर लावून सेवन करू शकता.

प्रतिकारशक्ती -

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, तुम्ही 2 चमचे तूप कोमट पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी सेवन करू करा. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत करते.

त्वचा -

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत तुपाचे सेवन केल्यास त्वचेशी संबंधित समस्या टाळता येतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तूप उपयुक्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT