Mumbai Indians Saam TV
इतर

MI IPL 2023 Schedule : मुंबई इंडियन्सचं 14 सामन्याचं वेळापत्रक; MIच्या कट्टर फॅनने पाठच करुन टाका

IPL 2023 : आयपीएलचा सोळाव्या सीजनला येत्या शुक्रवारी म्हणजेच 31 मार्चपासून सुरुवात होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

IPL 2023 News: प्रत्येक क्रिकेट फॅन सध्या  आयपीएलच्या नव्या सीजनची वाट पाहतोय. फॅन्सची ही प्रतीक्षा अवघ्या चार दिवसांनी संपणार आहे. कारण आयपीएलचा सोळाव्या सीजनला येत्या शुक्रवारी म्हणजेच 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. 31 मार्च ते 28 मे या कालावधीत आयपीएल खेळवला जाईल.

पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स आणि उपविजेता चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात शुक्रवार 31 मार्च रोजी होईल. संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरु होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा पहिला सामना खेळला जाणार आहे.

एकूण दहा संघ स्पर्धेत सहभागी होणार असून एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. 70 लीग सामन्यांनंतर, दोन क्वालिफायर आणि एक एलिमिनेटर आणि एक अंतिम सामना खेळला जाईल. प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी पहिल्या सामन्यासाठी 2 एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबई इंडियन्सच्या जबऱ्या फॅन्सना मुंबईचा प्रत्येका सामना कधी आहे माहित असायला हवं. म्हणून एकदा मुंबई इंडियन्सच्या टाईम टेबलवर नजर टाकूया.

मुंबई इंडियन्स टीमच्या सामन्यांचं वेळापत्रक

>> 2 एप्रिल-रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स

>> 8 एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

>> 11 एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

>> 16 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

>> 18 एप्रिल- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स

>> 22 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स

>> 25 एप्रिल- गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

>> 30 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

>> 3 मे- पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स

>> 6 मे- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

>> 9 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

>> 12 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स

>> 16 मे- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

>> 21 मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Money Plant: मनी प्लांट पाण्यात की मातीत लावावे, काय फायदेशीर?

Raigad Crime News : अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध, गर्भवती असल्याचं कळताच बालविवाह; रायगडमध्ये खळबळ

Karnataka Tourism: पार्टनरसोबत फिरायला जायचंय, मग कर्नाटकमधील 'या' ठिकाणी नक्की जा

VIDEO : 'तुला ऐकायला येत नाही का?' माऊलींच्या पालखीत चोपदाराचा उर्मटपणा, डोक्यावर तुळस असलेल्या महिलेला ढकललं

Maharashtra Politics: दोघही फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत, मराठी माणसाचा काय फायदा; उद्धव ठाकरेंनंतर राणेंचा राज ठाकरेंवरही हल्लाबोल

SCROLL FOR NEXT