भारतीय अंतराळवीर सुनिता विल्यम्स तब्बल ९ महिने अंतराळात राहून परतल्या आहेत.
सुनिता विल्यम्स यांचा जन्म अमेरिकेतील ओहायोमधील युक्लिड येथे झाला आहे.
मात्र भारतात त्यांचं एक सुंदर गाव आहे. आणि त्याबद्दल पुढे जाणून घेणार आहोत.
सुनिता विल्यम्सयांचे वडील दिपक पंड्या हे मुळचे गुजरातमध्ये जन्मलेले आहेत. यांचा जन्म गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन येथे झाला.
सनिता विल्यम्स त्यांच्या सुरक्षित प्रवासातून परत्यावर तिचे गावाकरी अभिमानाने त्यांचा जयघोश करू लागले.
गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन या छोट्याशा गावातील लोक ही बातमी ऐकताच घळाघळा अश्रू गाळायला लागले.
गावकरी माध्यमांवर माहिती देताना म्हणाले की, सुनीता विल्यम्सचे पुर्वज एकेकाळी राहत होते. हे घर अनेक वर्षे जुनं आहे. पण त्याच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत.
सुनिता विल्यम्सचे आजोबा या गावात राहत होते. हे घर ६० वर्षांपुर्वीचं आहे. तसेच सुनिता विल्यम्स २ ते ३ वेळा या गावात आल्या होत्या.
सुनीता विल्यम्स जेव्हा जेव्हा त्यांच्या गावात गेल्या आहेत तेव्हा तेव्हा त्यांनी तेथील ढोलमाता मंदिरात जावून पूजा केली आहे. त्यांची खूप या मंदिरावर खूप श्रद्धा आहे.