Whatsapp Hidden Features Saam Tv
Image Story

Whatsapp Tricks: Whatsapp च्या १० ट्रिक्स; कोणालाच माहित नाही, करतील अनेक कामे सोपी

Hidden Features: आज WhatsApp केवळ मेसेजिंग अ‍ॅप न राहता, जगभरातील २ अब्जांहून अधिक यूजर्सच्या दैनंदिन संवाद, कामकाज आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे.

Dhanshri Shintre

  • व्हॉट्सअ‍ॅपमध्ये प्रायव्हेट चॅट्स लॉक करण्याची सुविधा उपलब्ध

  • ड्युअल अकाउंट्समुळे काम आणि वैयक्तिक जीवन वेगळे ठेवता येते

  • मेटा एआयमुळे रिअल-टाइम अपडेट्स आणि नवे अनुभव मिळतात

  • मेसेज एडिट, अनडू डिलीट आणि एआय स्टिकर्समुळे चॅटिंग अधिक मजेदा

Whatsapp Hidden Features: व्हॉट्सअ‍ॅप केवळ मेसेजिंग अ‍ॅप न राहता आता जगभरातील २ अब्जांहून अधिक लोकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. मेटा कंपनी त्यात सतत नवे फिचर्स आणत असून, यामुळे चॅटिंग आणखी सोपे, आकर्षक आणि सुरक्षित होत आहे. बहुतेक यूजर्स फक्त बेसिक फिचर्स वापरतात, मात्र या अ‍ॅपमध्ये अनेक लपलेल्या युक्त्या दडलेल्या आहेत ज्या वापरल्यास तुमचा चॅटिंग अनुभव अधिक उत्तम होऊ शकतो.

व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी आता खाजगीपणाची अधिक सुरक्षितता उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडे वैयक्तिक किंवा गुप्त चॅट्स असतील, तर ते तुम्ही पासकोड, फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीने स्वतंत्रपणे लॉक करू शकता. यामुळे खाजगी संभाषण पूर्णपणे सुरक्षित राहते. याशिवाय, काम आणि वैयक्तिक जीवन वेगळे ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी एकाच स्मार्टफोनवर दोन स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स वापरण्याची सुविधाही दिली गेली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आता मेटा एआयचीही जोडणी करण्यात आली आहे, ज्यामुळे यूजर्सचा अनुभव अधिक समृद्ध झाला आहे. हे फीचर केवळ मजेदार संभाषणांसाठी नाही तर कल्पना निर्माण करण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी आणि रिअल-टाइम अपडेट्स मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. मग ते क्रीडा स्कोअर असो, ब्रेकिंग न्यूज असो किंवा इतर महत्वाची माहिती असो, आता सर्व काही थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये सहज उपलब्ध आहे.

आता जर तुम्ही चुकून ‘Delete for Me’ केले असेल तरी काळजी करण्याचे कारण नाही, कारण Undo फीचरमुळे मेसेज त्वरित परत मिळवता येतो. त्याचबरोबर, स्टिकर्स आवडणाऱ्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप अधिक मजेदार झाले आहे. यूजर्स आता स्वतःचा फोटो स्टिकरमध्ये रूपांतरित करू शकतात किंवा एआयच्या मदतीने अगदी खास, वेगळे आणि आकर्षक स्टिकर्स तयार करू शकतात, ज्यामुळे चॅटिंगचा अनुभव अधिक रंगतदार होतो.

व्हॉट्सअ‍ॅपने यूजर्सचा अनुभव आणखी सोपा केला आहे. आता मेसेज पाठवण्यासाठी नंबर कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह करण्याची आवश्यकता नाही. फक्त मोबाईल नंबर आणि कंट्री कोड टाकल्यानंतर लगेच चॅट सुरू करता येते. इतकेच नव्हे तर, जर मेसेजमध्ये काही चुका झाल्या असतील तर तो डिलीट करण्याची गरज नाही. कारण नवीन एडिट फीचरमुळे यूजर्स आधीच पाठवलेला मेसेज सहज दुरुस्त करून पुन्हा बरोबर स्वरूपात सादर करू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये चॅट हिस्ट्री सुरक्षित ठेवण्यासाठी बॅकअपची सुविधा उपलब्ध आहे. यूजर्स सेटिंग्जमध्ये जाऊन चॅट बॅकअप सक्रिय करू शकतात. त्यामुळे मोबाईल बदलला किंवा अ‍ॅप रीइन्स्टॉल केले तरी जुने संभाषण सहज परत मिळवता येते आणि महत्त्वाचे मेसेजेस कधीही हरवत नाहीत.

एकंदरीत, व्हॉट्सअ‍ॅपमधील ही लपलेली वैशिष्ट्ये यूजर्सच्या सोयीसाठी खास तयार करण्यात आली आहेत. ती तुमचा अनुभव अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि आनंददायी बनवतात. अजूनही तुम्ही ती वापरली नसतील, तर एकदा नक्की वापरून पाहा आणि चॅटिंग पूर्वीपेक्षा अधिक सोपे होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये जल्लोष

Maratha Protest: मराठा बांधवांचा जल्लोष; पाटील बोलते सबको को** | VIDEO

Manoj Jarange Full Name: मनोज जरांगे याचं पूर्ण नाव काय आहे?

Reem Shaikh: वेस्टर्न आउटफिटमधील रीम शेखचे सुंदर लूक, तुम्ही पण करु शकता रिक्रिएट

Accident : टायर फुटल्याने पोलीस कारचा भीषण अपघात; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT