Vaishnavi Hagwane Saam
Image Story

Vaishnavi Hagwane: क्रुर हगवणे फॅमिलीचे फोटो समोर; नणंद, पती अन्.. वैष्णवीला हालहाल करून मारलं

Vaishnavi Hagwane Death Case: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून, हुंडा आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक - शारीरिक छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble
Vaishnavi Hagwane

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुण्यासह राज्याचंही वातावरण तापलं. हुंडा आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून वैष्णवीने घरातच आत्महत्या केली. या प्रकरणात कस्पटे कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेत हगवणे कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली.

Vaishnavi Hagwane

सासू, सासरे, नवरा, दीर आणि नणंदेविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. सासू, नणंद आणि नवरा पोलिसांच्या ताब्यात असून, सासरा आणि दीर फरार आहेत. या गुन्हेगारांचे फोटो आता समोर आले आहेत.

Vaishnavi Hagwane

वैष्णवीच्या मृत्यूमागे नणंद करिष्मा हगवणे हिचा देखील सहभाग असल्याचं बोललं जात आहे. नणंदेनं देखील वैष्णवीचा छळ केला असल्याचा आरोप आहे. वैष्णवीला मारहाण करताना नणंद अंगावर थुंकली असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

Vaishnavi Hagwane

तर, सासूने वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. सासूने हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ करत तिला मारहाण केली होती.

Rajendra Hagwane

वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात माजी तालुकाध्यक्ष होते. त्यांच्यावरही सुनेवर मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

Shashank hagwane

तर, पती शंशाकने पत्नी गरोदर असताना वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. पोटात वाढत असलेलं मुल माझं नाहीच, असं म्हणत त्याने मानसिक छळ केला. तसेच वैष्णवीच्या घरच्यांकडून हुंड्यासाठी दबाव टाकत होता.

Vaishnavi hagwane

या प्रकरणात सासू,नणंद आणि दीर पोलिसांच्या ताब्यात असून, सासरा आणि दीर फरार आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

Vaishnavi hagwane

वैष्णवीची जाऊ मयुरीला देखील सासरच्या मंडळींनी छळ करत हुंड्यासाठी दबाव टाकला होता. तिला सासरच्या मंडळींनी मारहाण करत पैसे आणि महागड्या वस्तूंसाठी दबाव टाकला होता. तिने प्रसारमाध्यमांशी संवाद हगवणे कुटुंबाबात अनेक खुलासे केले आहेत.

hagawane

वैष्णवीचा दीर आणि मयुरीचा नवरा या प्रकरणात फरार असून, तो निर्दोश असल्याचं मयुरीने स्पष्ट केलं आहे. मयुरीच्या नवऱ्यानं त्याला कायम साथ दिली आहे. मात्र, सध्या फरार असल्यामुळे संशयाची सुई त्याच्याकडे वळत आहे.

Vaishnavi hagwane

वैष्णवीचे वडील आनंद कस्पेट यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, वैष्णवी आणि शंशाक यांचं २८ एप्रिल २०२३ रोजी प्रेमविवाह झाला होता. लग्नात त्यांनी भरभक्कम हुंडा दिला होता. लग्नात ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर तसेच इतर महागड्या वस्तू हुंडा म्हणून दिलं होतं. तरीही त्यांची मागणी आणखी वाढत गेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT