Devendra Fadnavis and Ajit Pawar  Saam TV
Image Story

PHOTO : अजित पवारांच्या आमदारांमुळे भाजपची कोंडी, तिकीट न मिळाल्यास 'हे' बडे नेते बंड करणार?

Saam Tv
Ajit Pawar

अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे विधानसभेसाठीच्या भाजपच्या इच्छुकांची कोंडी झाल्याचं चित्र आहे. अद्याप जागावाटप झालेलं नाही मात्र महायुतीत विद्यमान आमदारांच्या जागा त्या-त्या पक्षांना जातील, असं सूत्र जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जातंय. अनेक मतदारसंघांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत.

Sudhir Mungantiwar

मात्र याच ठिकाणी भाजपच्या अनेक इच्छुकांनी तयारी केल्याची माहिती आहे. तर तिकीटासाठी गेलेले सत्ता आल्यानंतर परत येतील, असा दावा मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केलाय.

Kagal Assembly constituency

कागल -

समरजितसिंह घाटगे यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. हसन मुश्रीफ हे सध्या कागलचे आमदार आहेत. महायुतीमध्ये ही जागा भाजपला सुटण्याची शक्यता कमीच असल्यामुळे घाटगे यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला. पण महायुतीमध्ये विधानसभा लढवण्यासाठी असे अनेकजण इच्छूक आहेत. विद्यमान आमदारांना डावलून त्यांना संधी मिळणार का? की ते नेते वेगळी वाट धरणार? याची चर्चा सुरु आहे.

Indapur Assembly constituency

इंदापूर -

हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु झाल्या होत्या. कारण, इंदापूर मतदारसंघातून ते विधानसभेसाठी इच्छूक आहेत. पण या ठिकाणी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत. दत्तात्रय भरणे यांना महायुतीकडून तिकिट मिळणार का? जर तिकिट नाही मिळाले तर हर्षवर्धन पाटील वेगळी वाट धरणार का? याची चर्चा इंदापूरमध्ये सुरु आहे.

vadgaon sheri assembly constituency

वडगाव शेरी -

अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर सुनील टिंगरे यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण आता त्यांना तिकिट मिळेल का? असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण वडगाव शेरी मतदारसंघामधून भाजपचे जगदीश मुळीक इच्छूक आहेत. आता या मतदारसंघात कुणाला तिकिट मिळणार, हे लवकरच समजेल.

Amalner Assembly constituency

अंमळनेर -

अमंळनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये जागावटपावरून तेढ निर्माण झालाय. येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पण या मतदारसंघात भाजपकडून शिरीष चौधरी इच्छूक आहेत. त्यामुळे अनिल पाटील यांना पुन्हा संधी मिळणार का? याची मतदारसंघात चर्चा सुरु आहे.

Kopargaon Assembly constituency

कोपरागव -

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे आहेत. पण यावेळी त्यांना भाजपकडून आव्हान मिळत आहे. विवेक कल्हे या मतदारसंघातून इच्छूक आहेत. आता महायुतीमध्ये कुणाला संधी मिळणार, याकडे लक्ष लागलेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT