तुम्ही दर महिन्याला फक्त १० हजार इतकी रक्कम म्युच्युअल फंडात एसआयपी (Systematic Investment Plan)मध्ये गुंतवली, आणि त्यावर सरासरी १२ टक्के वार्षिक परतावा मिळाला, तर काही काळातच ही छोटीशी गुंतवणूक तब्बल ₹७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. चक्रवाढीचा आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीचा प्रभाव किती मोठा असतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
एसआयपी हा गुंतवणुकीचा एक सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग. यात गुंतवणूकदार दर महिन्याला, तिमाही किंवा वार्षिक ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवतात. या पद्धतीने गुंतवणूक केल्यामुळे बाजाराच्या चढउताराचा धोका कमी होतो आणि रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंगच्या तत्त्वावर याचे काम सुरु राहते. म्हणजे बाजारातील भाव पडला तर जास्त युनिट्स मिळतात, तर बाजार वाढला तरी दीर्घकाळात सरासरी किंमत फायदेशीर ठरते.
किती वर्षांत मिळतील ₹७ कोटी?
एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर दर महिन्याला १०,००० रुपये गुंतवले, तर १० वर्षांत तुमची गुंतवणूक २३.२४ लाखांपर्यंत वाढते. या दिवसांमध्ये एकूण गुंतवणूक १२ लाख असते. २० वर्षांनंतर हीच गुंतवणूक जवळपास १ कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. २५ वर्षांत ती १.९० कोटी, तर ३० वर्षांत ३.५३ कोटी होते.
याच चक्रवाढीच्या परिणामामुळे ३५ वर्षांपर्यंत गुंतवणूक चालू ठेवल्यास एकूण ४२ लाखांच्या गुंतवणुकीवर निधी तब्बल ६.४९ कोटींवर पोहोचतो. म्हणजेच अजून काही वर्षे सातत्य ठेवले, तर ७ कोटी रुपयांचा टप्पा सहज गाठता येतो.
काही तज्ज्ञ सांगतात की, ''एसआयपी ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बेस्ट पर्याय आहे. कारण चक्रवाढीमुळे पैसा हळूहळू exponential पद्धतीने वाढतो. दीर्घकालीन गुंतवणुकीत बाजारातील अस्थिरतेचा फायदा मिळतो आणि जोखीमही तुलनेने कमी होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याची गरज राहत नाही.''
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.