ruturaj gaikwad yandex
Image Story

Duleep Trophy 2024: ऋतुराज गायकवाड होणार टीम इंडियाचा फ्युचर कॅप्टन? BCCI ने दिले संकेत

Ankush Dhavre
ruturaj gaikwad

येत्या काही दिवसात भारतात देशांतर्गत क्रिकेटचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंसह युवा खेळाडू खेळताना दिसून येणार आहेत. दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेला येत्या ५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

दरम्यान मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला या स्पर्धेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेत ऋतुराज गायकवाड सी संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

ruturaj gaikwad

भारतीय संघाचं नेतृत्व

ऋतुराज गायकवाडने गेल्या काही वर्षात फलंदाज म्हणून कर्णधार म्हणूनही चांगलीच प्रगती केली आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्याला आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. या स्पर्धेत त्याने भारतीय संघाचं नेतृत्व करत देशाला सुवर्णपदक जिंकून दिलं होतं.

ruturaj gaikwad

चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व

आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली होती

ruturaj gaikwad

अलीकडेच ऋतुराज गायकवाडने कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळेच रोहितने टी-२० संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर ऋतुराजच्या नावाचीही चर्चा झाली होती.

ruturaj gaikwad

आता दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सूर्यकुमार यादव, साई सुदर्शनसारखे खेळाडू त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे.

ruturaj gaikwad

सूर्यकुमार यादव हा भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आहे. मात्र तो आता दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल.

ruturaj gaikwad

या स्पर्धेसाठी असा आहे C संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सूथर, उमरान मलिक, वैषाक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशु चौहान, मयंक मारकंडे, आर्यन जुयाल (विकेटकीपर), संदीप वॉरियर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT