Konkan Railway  Saam tv
Image Story

Konkan Railway : मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका; सेवा ठप्प, प्रवाशांचा खोळंबा

Konkan Railway route : मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला आहे. यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

Vishal Gangurde
Konkan Railway news

गोवा येथील पेडणे बोगद्यात रेल्वे रूळावर पाणी येत असल्याने कोकण रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

Konkan Railway route

कोकण रेल्वे सेवा ठप्प झाल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

Konkan Railway service

गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस, कोच्चिवली एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग या रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने निघाल्या आहेत.

Konkan Railway tunnel

मुंबईवरून येणाऱ्या कोकणकन्या आणि तुतारी या गाड्या सावंतवाडी स्थानकातून परतीच्या प्रवासाला निघतील. कालपासून गोवा पेडणे बोगद्यात भूगर्भातून पाणी व माती रूळावर येत असल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली आहे.

Konkan Railway tunnel

मंगळवारी सायंकाळी बोगद्यात रूळावर पाणी आणि माती आली. त्यानंतर रेल्वे सेवा ठप्प झाली.

Konkan Railway tunnel work

गोवा येथील पेडणे बोगद्यात गेल्या काही तासांपासून मजूर बोगद्यात आलेले पाणी आणि चिखल बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Railway

बोगद्यातील पाणी आणि चिखल बाहेर काढण्याच्या कामामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Winter Wedding Tips: हिवाळ्यात लेहेंगा आणि साडीसह वापरा अशी जॅकेट आणि शाल ... ज्याने येईल ट्रेंडी लुक; थंडीपासूनही होईल बचाव

Saam Exit Poll: शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून काशीराम पावरा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : कसबा पेठमधून कोण निवडून येणार? रविंद्र धंगेकर की हेमंत रासने? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT