पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्व वन्यजीव दिनानिमित्त सोमवारीला गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात एका अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद घेतला.
पंतप्रधानांचा हा लुक सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध झाला.
यात पंतप्रधानांच्या हातात कॅमेरा आणि डोक्यावर टोपी असा सुंदर जंगल सफारीचा पोशाख पाहायला मिळाला.
सोमनाथहून परत्यानंतर मोदींनी सासनमधील वन अतिथीगृह 'सिंह सदन' या ठिकाणी रात्र काढून तिथल्या १२ ज्योतिर्लिंगापैकी पहिल्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.
या फोटोमध्ये नरेंद्र मोदी सिंहाचे फोटो काढताना दिसले. यात राष्ट्रीय उद्यानात सिंह सुर्यप्रकाशाचा आनंद घेतानाचा फोटो त्यांनी कॅप्चर केला आहे.
सिंहांची सगळ्यात जास्त संख्या गुजरात येथे पाहायली मिळते. हा 'प्रोजेक्ट लायन' अंतर्गत केलेला उपक्रम आहे.
'प्रोजेक्ट लायन' उपक्रमाकरता केंद्र सरकारने आशियाई सिंहांच्या संवर्धनासाठी २,९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेला येथे मंजुरी देण्यात आली आहे.