सिनेरसिक ओटीटी हे माध्यम मनोरंजनासाठी उत्तम मानले जाते. घरबसल्या प्रेक्षकांना ओटीटीवर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट, वेबसीरिज, वेब फिल्म, वेब शो पाहायला मिळतात.
ओटीटीवर थिएटरमध्ये रिलीज झालेले अनेक चित्रपट पाहायला मिळतात. अशातच १५ जुलै ते २१ जुलैपर्यंत ओटीटीवर वेगवेगळ्या धाटणीचे कलाकृती रिलीज होणार आहेत.
Amazon Prime Video, Netflix, Zee 5, Disney Plus Hotstar, Jio Cinema या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना कॉमेडी, ॲक्शन अशा वेगवेगळ्या जॉनरचा कंटेट पाहायला मिळणार आहे.
आडुजीविथमः द गॉट लाईफ (Aadujeevitham: The Got Life)
'आडुजीविथमः द गॉट लाईफ' हा साऊथ चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. येत्या १९ जुलैला नेटफ्लिक्स ओटीटीवर रिलीज होणार आहे. एका कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. यात पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहे.
कुंग फू पांडा ४ (Kung Fu Panda 4)
'कुंग फू पांडा ४' हा अमेरिकन ॲनिमेटेड मार्शल आर्ट कॉमेडी चित्रपट आहे. हा ओटीटी प्लॅटफॉर्म जियो सिनेमावर १५ जुलै रोजी रिलीज होणार आहे.
त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर (Tribhuvan Mishra CA Topper)
त्रिभुवन मिश्राच्या भूमिकेत अभिनेता मानव कौल दिसणार आहे. आपल्या मनाविरूद्ध तो काम करताना चित्रपटामध्ये दिसत आहे. त्रिभुवनच्या या स्टोरीमध्ये कॉमेडी, थ्रिलर आणि ड्रामा पाहायला मिळेल.
सीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत मानव कौलसह शुभ्रज्योती बारात, श्वेता बसू प्रसाद, तिलोत्तमा शोम, सुमित गुलाटी आणि नरेश गोसाई यांचाही समावेश आहे. ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर १८ जुलै रोजी रिलीज होणार आहे.
हरोम हारा (Harom Hara)
'हरोम हारा' चित्रपटाचे कथानक अवैध शस्त्रास्त्रांचा व्यापार करणाऱ्या एका गुंडावर आधारित आहे. तो कशाप्रकारे व्यापार करतो, हे पाहायला मिळेल. चित्रपटात सुधीर बाबू आणि मालविका शर्मा प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट १८ जुलै रोजी ETV Win वर प्रदर्शित होणार आहे.
नागेंद्रन'स हनिमून (Nagendran’s Honeymoons)
नागेंद्रन'स हनिमून ही एक रोमँटिक मल्याळम कॉमेडी सीरिज आहे. या सीरिजमध्ये सूरज वेंजरामुडू मुख्य भूमिकेत आहे. या सीरिजचे कथानक एका आळशी व्यक्तीच्या भोवती फिरते. पैसे जमावण्यासाठी तो काय काय करतो, हे आपल्याला सीरीजमध्ये पाहायला मिळेल. ही सीरीज डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १९ जुलैला रिलीज होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.