Image Story

Jio VoLTE-VoNR: Jio ने सुरु केली नवीन सेवा; VoLTE की VoNR? नवीन 5G सेवेत कोणता फरक जाणून घ्या

Reliance Jio News Features: देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने दिवाळीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी नवीन VoNR सेवा देशभरात सुरू करत डिजिटल कनेक्टिव्हिटीला नवा आयाम दिला.

Dhanshri Shintre

जिओला ९ वर्ष पूर्ण

देशातील नंबर वन टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने ९ वर्षे पूर्ण केल्यानंतर आकर्षक ऑफर्स दिल्या होत्या. आता दिवाळीपूर्वी कंपनीने नवी घोषणा करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

जिओची नवीन सेवा सुरु

जिओ सिम वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी रिलायन्स जिओने आपल्या तब्बल ५० कोटी ग्राहकांसाठी नवीन सेवा सुरू करून मोठा सरप्राईज दिला आहे.

जिओने VoNR सेवा सुरू केली

रिलायन्स जिओने देशभरातील ग्राहकांसाठी VoNR सेवा सुरू केली आहे. ही VoLTE ची अपग्रेडेड आवृत्ती असून, यामुळे कॉलिंगचा अनुभव अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.

VoNR आणि VoLTE मधील फरक

जिओने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित VoNR सेवा विकसित केली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना 5G नेटवर्कवर उच्च गुणवत्तेच्या कॉलिंगचा अनुभव मिळेल. चला जाणून घेऊया VoNR आणि VoLTE मधील फरक काय आहे.

VoNR म्हणजे काय?

Jio VoNR आणि VoLTE यातील मुख्य फरक म्हणजे तंत्रज्ञान. VoNR हे फक्त 5G नेटवर्कवर चालते, ज्यामुळे यूजर्सना उत्कृष्ट 5G व्हॉइस कॉलिंगसोबत अधिक जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळते.

VoLTE म्हणजे काय?

VoLTE सेवा 4G नेटवर्कवर चालते आणि कॉल कनेक्ट होण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण नवीन VoNR तंत्रज्ञान 5G वर आधारित असल्याने कॉल त्वरित कनेक्ट होतो.

5G नेटवर्क उपलब्ध असणे गरजेचे आहे

फोनच्या सेटिंग्जमध्ये VoNR सुरू केल्यास, नेटवर्कवर VoLTE ऐवजी VoNR दिसेल. मात्र, ही सेवा वापरण्यासाठी तुमच्या परिसरात 5G नेटवर्क उपलब्ध असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2026 Astrology Predictions: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बनणार शुक्र-नेपच्युनची युती; या राशींना अफाट पैशांसह यशही मिळणार

Maharashtra Live News Update: पुण्यात वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीशी युती नाही

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरेंची खास पोस्ट, म्हणाल्या आजच

KDMC Seat Sharing : शिवसेना-भाजपचं जागावाटप ठरलं, कल्याणमध्ये कोण किती जागा लढणार? वाचा

Nashik Dwarka: द्वारका चौकाची कोंडी फुटणार; २१४ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT