Bangkok Tour Package saam tv
Image Story

IRCTC Tour Package 2025: स्वस्तात करा बँकॉकची ट्रीप; धमाल आहे IRCTCचं टूर पॅकेज

IRCTC Bangkok Tour Package: नव्या वर्षाच्या निमित्ताने कुठे फिरण्याचा प्लान करत असला तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. IRCTC ने आंतरराष्ट्रीय ट्रीपसाठी नवा प्लान आणलाय.

Bharat Jadhav

आयआरसीटीने तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी एक खास प्लान आणलाय. आयआरटीसीने Exotic Thailand Ex Jaipur नावाने टूर पॅकेज लॉन्च केलंय.

यात तुम्हाला ५ रात्र आणि ६ दिवस थायलंडमध्ये राहता येणार आहे. थायलंडच्या प्रमुख शहरांमध्ये बँकॉक आणि पटायाच्या शानदार पर्यटन स्थळांना भेट देता येईल.

अगदी कमी बजेटमध्ये थायलंडला भेट देण्याची संधी आहे. राहण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत कशाचीही काळजी करण्याची गरज नाही.

11 फेब्रुवारी २०२५ च्या जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संध्याकाळी साडेसात वाजता फ्लाइट उड्डाण भरेल. ही फ्लाइट ११.०५ वाजता बँकॉकला पोहोचेल.

आयआरसीटीसीच्या प्रतिनिधी द्वारे विमानतळावर तुम्हाला याची माहिती मिळून जाईल. प्लाइट नंबर FD131 वर स्वार होत तुम्हाला थायलंड गाठायचं आहे.

या पॅकेजच्या अतंर्गत तीन स्टार हॉटेलमध्ये तुमच्या वस्तीची सोय करण्यात आलीय. तेथे तुम्हाला ब्रेकफास्टपासून ते रात्रीचे जेवण सु्द्धा याच पॅकेजच्या पैशात सामविष्ट असणार आहे.

त्यात अजून एक गोष्ट म्हणजे ट्रॅव्हल इन्शुरन्ससुद्धा यात कवर करण्यात आलंय. जर तुम्ही सोलो ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला ६२८४५ रुपये खर्च येईल.

जर तुम्ही दोन जण किंवा तीन जण प्रवास करत असाल तर प्रत्येक व्यक्तीसाठी ५४७१० रुपये इतका खर्च लागेल. आयआरसीटीसीची वेबसाईटवर जाऊन तुम्ही पॅकेज बुक करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT