भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट हरियाणा विधानसभा निवडणुकीत ६०१५ मतांनी विजयी झाली आहे.
विनेश फोगटला कुस्तीचा आखाडा राखता आली नाही पण तिने राजकारणाचा आकाडा गाजवला. सध्या विनेश फोगाटवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विनेश फोगटने हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि ती विजयी झाली.
कुस्तीपटू विनेश फोगाटचा जन्म २५ ऑगस्ट १९९४ रोजी हरियाणातील भिवानी येथे झाला.विनेश फोगटचा जन्म ज्या कुटुंबात झाला तेही कुस्तीशी संबंधित आहे.
विनेश फोगटने हरियाणाच्या केएमसी वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने हरियाणाच्या महर्षी दयानंद विद्यापीठतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
विनेश फोगटचे कुटुंब सुरुवातीपासूनच कुस्तीशी निगडीत असून तिचे काका महावीर सिंग फोगट राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आणि प्रशिक्षक आहेत. त्यांना द्रोणाचार्य पुरस्कारही मिळाला आहे.
कुस्तीमध्ये विनेश फोगटने एकापाठोपाठ एक असे अनेक विक्रम केलेत. विनेशने कुस्ती स्पर्धांमध्ये अनेक यशाची शिखरं गाठली आहेत.
विनेश फोगटने २०१६, २०१७ आणि २०१८ असे तीन वेळा राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले.
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे ती अनेक महिने खेळापासून दूर राहिली. पण लवकरच तिने पुनरागमन केले.
२०१८ मध्ये तिने आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. २०२१९ मध्ये जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. विनेशने आशियाई चॅम्पियनशिपमध्येही दोनदा सुवर्णपदक पटकावले.
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळे विनेश फोगट ही खेळाडूंच्या चळवळीतील एक चेहरा राहिली.
विनेशने यावर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या श्रेणीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.