पहिला तिरंगा ६ ऑगस्ट १९०६ रोजी पारसी बागान चौक (ग्रीन पार्क) कोलकाता येथे हा फडकविण्यात आला होता. हा ध्वज लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाच्या समांतर पट्ट्यापासून बनवलेला होता.
दुसरा तिरंगा पॅरिसमध्ये मॅडम कामा आणि त्यांच्यासोबत असलेल्या क्रांतिकाऱ्यांनी १९०७ मध्ये फडकावला होता. यावेळी तिरंग्याच्या वरच्या बाजूला एक कमळ आणि सात तारे होते. हा ध्वज बर्लिनमधील समाजवादी परिषदेत दाखविण्यात आला होता.
तिसरा तिरंगा १९१७ मध्ये फडकविण्यात आला होता. तेव्हा डॉ. अॅनी बेझेंट आणि लोकमान्य टिळक यांनी हा तिरंगा आंदोलनादरम्यान फडकवला होता. या ध्वजामध्ये ५ लाल आणि ४ हिरव्या रंगाच्या समांतर पट्ट्या होत्या, नंतर सात तारे होते. एका कोपऱ्यामध्ये पांढऱ्या रंगाचा अर्धचंद्र आणि एक तारा होता.
भारताचा चौथा ध्वज १९२१ मध्ये विजयवाडा येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सत्रात समोर आला होता. आंध्रप्रदेशातील एका तरुणाने हा तिरंगा तयार करून गांधीजींना दिला होता. हा तिरंगा लाल आणि हिरव्या रंगांनी बनवला गेला होता. वरच्या बाजूला सफेद पट्टीवर चरखा होता.
ध्वजांच्या इतिहासात १९३१ हे वर्ष संस्मरणीय ठरणारं होतं. हा तिरंगा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यासाठी एक ठराव देखील पारित केला गेला. हा तिरंगा सध्याच्या तिरंगाचं आधीचं स्वरुप आहे. हा तिरंगा भगवा, पांढरा, हिरवा अशा तिन रंगांनी बनलेला होता. याच्या मध्यभागी गांधीजींचा चालत असलेला चरखा होता.
भारताचा सहावा ध्वज २२ जुलै १९४७ रोजी स्वीकारला गेला होता. या ध्वजात पांढरा, हिरवा आणि भगवा असे तिन रंग होते. फक्त तिरंग्यामध्ये चरख्याऐवजी सम्राट अशोक धर्म चक्र दाखविण्यात आलेय. यानंतर ध्वजाच्या रचनेत काहीही बदल झालेले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.