नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) या सप्टेंबरच्या अखेरीस भव्य उद्घाटन करण्यास तयारी करत असताना महाराष्ट्र देखील या परिवर्तनासाठी सज्ज आहे. मुंबईतील वर्दळीच्या विमानतळावरील भार कमी करत हे नवीन विमानतळ आर्थिक विकासाला गती देण्यास, गुंतवणूका आकर्षित करण्यास आणि राज्यभरात पायाभूत सुविधेला चालना देण्यास सज्ज आहे.
यंदा नव्याने बांधण्यात आलेल्या एनएमआयएवरून पहिली फ्लाइट उड्डाण घेईल तेव्हा तो क्षण विमानतळाच्या उद्घाटनासह महाराष्ट्राच्या भावी आर्थिक विकासाच्या नवीन शुभारंभाचे प्रतीक देखील असेल.
अनेक दशकापासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) प्रांतातील वाढत्या नागरी विमान वाहतूकीचा भार सांभाळत आहे, जवळपास क्षमतेपेक्षा अधिक कार्यचालन सांभाळत आहे आणि मर्यादित भूभागावर व्यवस्थापन करत आहे.
विस्तृत डिझाइन, आधुनिक सुविधा आणि धोरणात्मक स्थितीसह एनएमआयए वाणिज्य, लॉजिस्टिक्स व कनेक्टीव्हीटीचे केंद्र म्हणून नवी मुंबईच्या भविष्याला नवीन आकार देण्याची खात्री देते.
एनएमआयएची आर्थिक क्षमता तिकीट काउंटर आणि बॅगेज बेल्टच्या पलीकडे आहे. अंदाजानुसार, विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी ९० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याची अपेक्षा आहे. या नवीन विमानतळासह ग्राऊंड स्टाफ, हॉस्पिटॅलिटी, लॉजिस्टिक्स व रिटेलपर्यंत हजारो नवीन रोजगार निर्माण होईल. या विकासाचा प्रभाव मोठा आहे. नुकतेच इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए)च्या अहवालामधून निदर्शनास येते की, विमान वाहतूक कनेक्टीव्हीटीमध्ये प्रत्येक १ टक्के वाढ ग्रॉस डॉमेस्टिक प्रॉडक्ट (जीडीपीमध्ये) ०.५ टक्क्यांनी वाढ करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.