अंतराळातून आणखी एक आकाश आपत्ती वेगाने पृथ्वीच्या दिशेने सरकतेय. विशेष म्हणजे ही आपत्ती पृथ्वीबरोबरच आपल्या चंद्रासाठीही मोठा धोका ठरण्याची शक्यता आहे.
पृथ्वीच्या दिशेने जाणाऱ्या एका विशाल लघुग्रहामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढलीये. 2024 YR4 नावाचा हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नासाने व्यक्त केलीये.
आता नवीन एका संशोधनात, हा लघुग्रह केवळ पृथ्वीशीच नव्हे तर चंद्राशीही धडकू शकतो असं समोर आलंय.
नासाच्या सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजच्या अभ्यासानुसार, २०३२ मध्ये लघुग्रह 2024 YR4 पृथ्वीवर धडकण्याची शक्यता १ टक्क्यांवरून २.३ टक्क्यांपर्यंत वाढलीये.
शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केलीये की, चंद्रावर वातावरण नाहीये. अशा वेळी लघुग्रहाचा वेग कमी होणार नाही. जर तो त्याच्या वेगाने चंद्रावर आदळला तर मोठं नुकसान होऊ शकतं
असं झाल्यास चंद्रावर शेकडो मीटर रुंदीचा खड्डा तयार होऊ शकतो, ज्यामुळे त्याचा ढिगारा अंतराळात पसरेल. याचा फटका पृथ्वीलाही पोहोचू शकतो.
शास्त्रज्ञ या लघुग्रहाला 'सिटी किलर' म्हटलं आहे, ज्यामुळे पृथ्वीच्या कोणत्याही भागाचं मोठं नुकसान होऊ शकतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.