Image Story

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes In Marathi: पंढरीची वाट चालणाऱ्या या भक्तिपर्वात आपल्या प्रियजनांना पाठवा आषाढी एकादशीच्या खास शुभेच्छा. विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी भक्ती व्यक्त करत शुभ संदेश देऊन सोहळ्याचा आनंद द्विगुणित करा.

Dhanshri Shintre

हिंदू धर्मात देवशयनी एकादशी, ज्याला आषाढी एकादशी म्हणतात, विशेष महत्त्वाची मानली जाते. हा सण आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरा होतो. यंदा हा दिवस 6 जुलैला म्हणजेच आज आहे. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि चातुर्मास सुरू होतो, जो भक्ती, साधना आणि आत्मसंयमाचा काळ मानला जातो.

देवशयनी एकादशीला भक्त उपवास करून भगवान विष्णूची भक्ती करतात. या पवित्र दिवशी आप्तेष्टांना शुभेच्छा देण्याची सुंदर परंपरा आहे. जर तुम्हालाही आपल्या प्रियजनांना शुभेच्छा द्यायच्या असतील, तर येथे खास मराठी शुभेच्छा संदेश दिले आहेत. या शुभ दिनी सद्भावना व्यक्त करा आणि भक्तिभावाने दिवस साजरा करा.

चंद्रभागेच्या तीरी,

उभा मंदिरी,

तो पहा विटेवरी…

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

अबीर गुलाल उधळीत रंग

नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

विठ्ठल नाम घेता, दुःख - चिंता हरपते

आजच्या दिवशी प्रेम, शांती, भक्तीची अनुभूती होवो

तुमचं जीवन सदैव मंगलमय होवो!

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

सोहळा जमला आषाढी वारीचा

सण आला पंढरीचा,

मेळा जमला भक्तगणांचा,

ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

देव दिसे ठाई ठाई, भक्ततीन भक्तापाई,

सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर,

चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर..

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT