Kaam Trikon Yog saam tv
राशिभविष्य

Labh Drishti Yog 2025: 18 नोव्हेंबरपासून 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; बँक बॅलन्स डबल होऊन सर्व स्वप्नही होणार पूर्ण

November 18 zodiac signs: ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिना हा ग्रहांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी काही महत्त्वपूर्ण ग्रहांचं गोचर होणार असून यामुळे काही राजयोगांचीही निर्मिती होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह दर महिन्याला राशीमध्ये बदल करतो. तो एका राशीत सुमारे १५ दिवस राहतो आणि त्यानंतर तो राशीमध्ये बदल करतो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, सध्या बुध ग्रह वृश्चिक राशीत असून या ठिकाणी तो मंगळ ग्रहासोबत युती करणार आहे. बुध मकर राशीत विराजमान यम ग्रहासोबत संयोग करून ‘लाभ दृष्टि योग’ तयार करणार आहे. येत्या काळात म्हणजे १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांनी बुध आणि यम एकमेकांपासून ६० अंशांवर असणार आहे. ज्यामुळे हा योग प्रभावी होणार आहे. चंद्र राशीच्या आधारावर केलेल्या विश्लेषणानुसार, खालील तीन राशींना या योगाचा विशेष लाभ मिळू शकणार आहे.

मेष राशी (Aries)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभ दृष्टि योग अत्यंत फलदायी ठरू शकणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. धनसंपत्ती आणि आर्थिक वृद्धीचे संकेत मिळू शकणार आहेत. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीचे स्वामी मंगल सध्या अष्टम भावात विराजमान आहेत. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे पदोन्नती आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकणार आहे.

मिथुन राशी (Gemini)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बुध-यम संयोगातून तयार होणारा त्रिकादश योग अत्यंत अनुकूल ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना विविध क्षेत्रांत सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगली संधी मिळू शकणार आहे. यावेळी प्रत्येक कामात तुम्हाला लाभ मिळणार आहे.

मकर राशी (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी बुध-यम संयोगातून तयार होणारा लाभ दृष्टि योग अत्यंत शुभ ठरू शकतो. अनेक काळापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यापार क्षेत्रात स्पर्धकांवर मात करत यश मिळू शकणार आहे. तुम्ही करत असलेल्या व्यवहारांमध्ये फायदा होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Doctor Case: सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई, PSI गोपाल बदने पोलिस खात्यातून बडतर्फ

Haldi Rituals: लग्नाच्या आधी हळदीचा विधी का करावा, जाणून घ्या कारण

मानलं राव! शेतकऱ्यांच्या लेकींच्या मदतीसाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे सरसावले; शिक्षणासाठी 11 लाखांची मदत

लग्नानंतर स्तनांचा आकार खरोखर वाढतो? नेमकं कारण काय? तज्ज्ञांनी दिली खरी माहिती

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची बैठक

SCROLL FOR NEXT