Purva Nakshatra 
राशिभविष्य

Purva Nakshatra: पूर्वा नक्षत्र असलेले लोक कमवतात इतिहासात नाव, मिळवतात अफाट पैसा; वाचा संपूर्ण माहिती

Purva Nakshatra Personality: पूर्वा नक्षत्र हे नक्षत्र शुक्र या ग्रहाच्या अंमलाखाली येते. या नक्षत्राचे लोक बुद्धिमान, धूर्त, धाडसी व्यवहार कुशल काहीसे स्वार्थी खाली खुशाली मध्ये दंग असणाऱ्या, प्रवासाची आवड असणारे असतात.

Saam Tv

पूर्वा नक्षत्र

हे नक्षत्र शुक्र या ग्रहाच्या अंमलाखाली येते. या नक्षत्राचे लोक बुद्धिमान, धूर्त, धाडसी व्यवहार कुशल काहीसे स्वार्थी खाली खुशाली मध्ये दंग असणाऱ्या, प्रवासाची आवड असणारे असतात. त्यांच्यावर बऱ्याच वेळा पाश्चात्त्य विचारांचा प्रभाव असतो. मग ते पाश्चात्य खेळ असो, विज्ञान कला इत्यादी. यांना मनोरंजनाची चांगली जाणीवपूर्वक आवड असते, संगीतात रस घेतात, संगीत प्रेमी, कवी मनाचे, कवितेचा रसस्वाद घेणारे, मनाने उदार, उदात्तवृत्ती, हसरे उमदे व्यक्तिमत्व असते. विनोदाची आवड, चित्रकला, रेखाचित्राची विशेष आवड असते.

कलाकार, वस्त्र दागिन्यांमध्ये खास चॉईस असतो. अभिनय, कलेची आवड, काही वेळा भडक किंवा लोकांच्या नजरेला खटकणारी वेशभूषा करतात. भेटवस्तू देण्याची आवड असते. प्रवासाची आवड वरच्या बॉसची मैत्री साधण्यात कौशल्य असते. स्त्रियांविषयी आपुलकी असते. बऱ्याच वेळा अज्ञात अशा शंका कुशंका मनात आणून व्यथीत होतात. घटना चटकन मनाला लागते स्वतःला कोणीतरी खास आहोत अशी भावना असते. त्यामुळे घमेंडखोर असा छाप बसतो. खेळ आणि राजकारण यांच्यापासून प्रेरणा मिळते.

नोकरी व्यवसाय -

या नक्षत्राच्या व्यक्ती सरकारी खात्यात आपल्या मेहनतीने वर जातात. दळणवळण खाते, आकाशवाणी, क्रीडा खाते, प्राचीन वस्तूंचा संग्रह करणारे, संग्रहालयामध्ये अत्यंत कुशल वावर, त्या प्रेझेंट करण्यामध्ये यशस्वी होतात. ऑटोमोबाईल, शेतांवर औषध टाकणारे किंवा औषधांचे व्यापार निर्मिती, सिनेमा, स्टुडिओ, टीव्ही, फोटोग्राफी, याच्याशी संबंधित व्यवसाय असतात.

गुप्तरोग विशेषतज्ञ, तुरुंग निरीक्षक, सिगारेट कंपनीशी संलग्न सल्लागार असतात. तंबाखू संबंधित किंवा तंबाखू शेती करू शकतात. पशु चिकित्सालय तसेच वाईस चॅन्सलर, सर्जन म्हणून प्रतीथयश होतात.

रोग व आजार -

या व्यक्तींना गॅस ट्रबल, हृदयरोग, रक्तदाब, अतिसार, पायावर आघात, पाठदुखी, मुकामार, पशु दुर्घटना, नाडी पिडा, प्रेमामध्ये अपयश त्यामुळे मानसिक विकृती असे आजार होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup Squad : शुभमन गिलचा पत्ता कट, २ वर्षांपासून संघाबाहेर असणाऱ्या खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

Chutney Recipes: 2025 मध्ये जिभेचे चोचले पुरवणाऱ्या या 5 चटण्या, नवीन वर्ष सुरू होण्याआधी नक्की ट्राय करा

Shocking : पीजीमध्ये राहणारी तरुणी दारू पिऊन आली, घरमालकाने तिच्यासोबत केलं भयंकर कृत्य; पुण्यात खळबळ

T20 World Cup India Squad : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, गिलचा पत्ता कट, कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे यांच्यासमोर वसंत मोरे करणार पुणे महापालिकेची पोलखोल

SCROLL FOR NEXT