Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत कसा राहील हा आठवडा? वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Weekly Horoscope 15 To 21 July: जुलै महिन्याचा तिसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे. 15 ते 21 जुलै हा आठवडा 12 राशींसाठी कसा राहील हे जाणून घेऊया.

साम टिव्ही ब्युरो

जुलै महिन्याचा तिसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे. काही राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात लाभ मिळू शकतो. तर काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात चढ-उतार येतील. 15 ते 21 जुलै हा आठवडा 12 राशींसाठी कसा राहील हे जाणून घेऊया...

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ-उतारांचा असेल. कौटुंबिक वादामुळे मन अस्वस्थ राहील. तुमच्या जोडीदाराशी वैचारिक मतभेद आणि तणाव राहील. तुमच्या कोणत्याही निर्णयाला विरोध होऊ शकतो. या आठवड्यात ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी वाद टाळा. काही नवीन लोक भेटतील. राजकीय क्षेत्रात लाभ होईल.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. मानसिक तणावापासून दूर राहाल. मित्रांसोबत फिरण्याची योजना बनवता येईल. काही वैयक्तिक कामे पूर्ण केल्याने मनःशांती मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात.

मिथुन: मिथुन राशीचे लोक काही नवीन कामाची योजना आखू शकतात. तुमच्या आत नवीन ऊर्जा अनुभवायला मिळेल. काही काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य आनंदी दिसतील. कौटुंबिक समस्या सोडवण्यात यश मिळेल. तुम्ही प्रमोशनची वाट पाहत असाल तर या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.

कर्क: कर्क राशीच्या लोकांनी या आठवड्यात विचारपूर्वक काम करावे, अन्यथा नुकसान होऊ शकतं. तुमच्या जीवनात वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शांत राहुल वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मुलांच्या शिक्षणाबाबत तणाव राहील.

सिंह: सिंह राशीच्या लोकांना कुटुंबासाठी महत्त्वाचे निर्णय घेणे भाग पडू शकते. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या. काही नवीन लोक भेटू शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

कन्या : कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. एखादे काम नियोजित असेल तर ते पूर्ण होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे नियोजन करता येईल. मालमत्ता विकून नवीन प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.

तूळ : तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ-उतारांचा राहील. तब्येत बिघडल्याने चिडचिड होऊ शकते. व्यवसायात नुकसान होऊ शकते. या आठवड्यात कोणतेही सौदे करू नका. तुमच्या कार्यक्षेत्रात अजिबात बदल करू नका.

वृश्चिक : या आठवड्यात तुम्हाला चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या जोडीदाराच्या वागण्यामुळे तुम्ही त्रस्त राहू शकता, त्यामुळे एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पालकांशी नक्कीच चर्चा करा.

धनु : धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काही विशेष असणार नाही. तब्येतीची चिंता राहील. कामाच्या ताणामुळे मानसिक तणाव राहील. एखाद्या कामात वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळू शकते. प्रत्येक निर्णय विचार करून घ्या.

मकर: मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात अनेक समस्या येऊ शकतात. रखडलेल्या कामात थोडी प्रगती दिसेल. तुम्हाला सासरच्या लोकांकडून आर्थिक मदत मिळू शकते. बँक बॅलन्स वाढवण्यात यश मिळेल. आरोग्य चांगलं राहील.

कुंभ : या आठवड्यात न्यायालयीन खटल्यात विजय मिळेल. समाज आणि राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा निर्माण होईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. तुमच्या आयुष्यात नवीन जोडीदार येऊ शकतो.

मीन : मीन राशीच्या लोकांना मानसिक दबाव जाणवेल. त्यामुळे तुमच्या कामात नकारात्मक बदल दिसून येतील. आई-वडील किंवा भावांशी भांडण होऊ शकते. कौटुंबिक वातावरण बिघडू शकते. कुटुंबापासून वेगळे होण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT