Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : संकटातून यशस्वीपणे मार्ग काढाल; ५ राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार

Wednesday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना संकटातून मार्ग काढावा लागेल. तर काहींना मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल.

Anjali Potdar

पंचांग

बुधवार,२९ ऑक्टोबर २०२५,कार्तिक शुक्लपक्ष.

तिथी-सप्तमी ०९|२४

नक्षत्र-उत्तराषाढा

रास-मकर

योग-धृति

करण-वणिज

दिनविशेष-९ प.चांगला

मेष - कोणत्याही गोष्टीची चाल चाल ढकल आज परवडणारी नाही. जीव ओतून काम करावे लागेल. कामाच्या निमित्ताने प्रवास होतील. सामाजिक क्षेत्रात विशेष रस घेऊन कामे कराल.

वृषभ - आजपर्यंत केलेल्या कामाचे चीज होण्याचा आजचा दिवस आहे. मनी - धनी नसताना काही चांगल्या बातम्या कानावर येतील. जीवन जगण्याची कला, हुरूप आणि उमेद आज वाढेल.

मिथुन - कागदपत्रांशी निगडित व्यवहार आज जपून करावे लागतील. कुठेही साक्षीदार राहू नका. आपल्या व्यक्तींसमोर मन मोकळे करायला हरकत नाही. पण जीवन हा एकट्याचा प्रवास आहे हे पुन्हा एकदा जाणवेल.

कर्क - कोणासाठी कितीही केले तरी सुद्धा काही गोष्टींचा गाडा आपल्यालाच ओढावा लागतो. संसारिक जबाबदाऱ्या पार पाडताना आज दमछाक होईल. पण जोडीदाराची साथ ही मिळेल आणि दिवस नियंत्रित राहील.

सिंह - पाठीच्या मणक्याचे आजार, हृदयाचे आजार ज्यांना आहे त्यांच्यासाठी आज विशेष अलर्टचा दिवस आहे. तब्येत जपणे हेच प्राधान्य आज समजा. नोकरीशी निगडित मात्र चांगल्या गोष्टी आज घडतील.

कन्या - विष्णू उपासनेने मनोरथ पूर्ण होतील. ठरवाल तशा गोष्टी होतील. प्रेमवीरांना आजचा दिवस सुसंधी घेऊन आलेला आहे. धनयोग सुद्धा चांगले आहेत. आज कशाचीच कमी नाही असे भावना होईल.

तूळ - व्यवसायामध्ये वृद्धीचा दिवस आहे. नवनवीन संकल्पनांनी भरलेल्या गोष्टी आज अमलात आणाल. जमिनीशी निगडित व्यवहारी होतील. एकूणच सुखाचा संदेश देणारा दिवस आहे.

वृश्चिक - जपलेल्या गोष्टी वेळेला कामाला येतात मग ते नातेवाईक असो शेजारी असो मित्र-मैत्रिणी असो. आज अडचणी आल्या तरी पाठीशी कोणीतरी खंबीर उभे आहे ही भावना असेल.

धनु - धनयोग चांगले आहेत. पैशाची साठवण करण्यापेक्षा तो खेळता पैसा अधिक चांगला राहतो हे आपल्याला जाणवेल. त्यामुळे गुंतवणूक तर करालच पण खर्चही तितकाच होईल. कुठेतरी मोठ्या व्यक्तीच्या सल्ल्याने पुढे जाल.

मकर - शक्यतो आपल्याच धुंदीमध्ये असणारी आपली रास आहे. आज अधिक स्वमग्न होईल. याच गोष्टी तुम्हाला आवडतील. काही गोष्टी नकारात्मक घेण्याची आपली रास आहे पण आज मात्र आयुष्य फुलपाखरासारखे आहे हे जाणवेल.

कुंभ - संकटातून मार्ग आज काढावा लागेल. कारण नसताना पुढे कटकटी उभ्या राहतील. खर्चालाही धरबंद राहणार नाही. काही संशोधनात्मक कार्यामध्ये पुढाकार घेऊन कामे कराल.

मीन - जवळच्या लोकांबरोबर स्नेहबंध दृढ होतील. प्रेमामध्ये यश मिळण्याचा आजचा दिवस आहे. परदेश गमनाशी निगडित काही गोष्टींचे नियोजन होईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT