Shukra Nakshatra Parivartan 2025 saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar: 27 ऑगस्टला मित्राच्या नक्षत्रात प्रवेश करणार शुक्र; 'या' राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार

Shukra Nakshatra Parivartan 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाच्या स्थितीतील बदलाचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. २७ ऑगस्ट २०२५ रोजी शुक्र ग्रह शनीच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सनातन धर्मात शुक्रग्रहाला वैभव, ऐश्वर्य, प्रेम आणि सुख-सुविधा देणारा शुभ ग्रह मानलं जातं. हा ग्रह देखील इतर ग्रहांप्रमाणे वेळोवेळी नक्षत्र आणि राशीमध्ये गोचर करत असतो. येत्या २३ ऑगस्टला शुक्र ग्रह शनीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचा अधिपती शनी ग्रह आहे, ज्याला न्यायदेवता मानलं जातं आणि जो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो.

ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र आणि शनी हे एकमेकांचे मित्र मानले जातात. त्यामुळे या दोन शुभ ग्रहांचा संगम काही राशींना विशेष लाभदायक ठरणार आहे. या काळात कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

तूळ राशी

शुक्र ग्रहाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश हा तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीतील अडथळे दूर होणार आहेत. त्याचप्रमाणे वरिष्ठांचा विशेष सन्मान आणि जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

कर्क राशी

कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या या नक्षत्र बदलामुळे अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कमाईची नवीन साधनं निर्माण होतील. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. विवाहित जीवन अधिक सुखद होईल, तर जोडीदारासोबत खास क्षण घालवता येऊ शकतात.

कन्या राशी

शुक्र ग्रहाचं गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल सिद्ध होण्याची शक्यता आहे. मुलांच्या अभ्यासाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकतं. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates : अमित ठाकरेंचा आज पुणे दौरा, मानाच्या गणपतीचं घेणार दर्शन

Male infertility treatment: २५-४० वयोगटातील पुरुषांचा स्पर्म काऊंट घटतोय; कसे केले जातात या समस्येवर उपचार?

Beed Crime : बीडमध्ये चाललंय काय? मध्यरात्री परळी स्थानकावर चिमुरडीला नेलं अन् बलात्कार

Pune Crime : महिलांचा वेश करून कंपनीमध्ये चोरी; पुण्यातील धक्कादायक प्रकार, सराईत चोरटे अटकेत

Nargis Fakhri Wedding: बॉलिवूड अभिनेत्रीने वयाच्या ४५ व्या वर्षी थाटला संसार; बॉयफ्रेंडसोबत गुपचुप केलं लग्न

SCROLL FOR NEXT