Shukra Nakshatra Gochar  saam tv
राशिभविष्य

Shukra Nakshatra Gochar : बृहस्पतिच्या नक्षत्रामध्ये शुक्र ग्रहाचं गोचर; 'या' राशींच्या अडचणी वाढणार, आयुष्यात काहीतरी वाईट घडणार

Shukra Nakshatra Gochar 2025: भगवान शुक्र 24 ते 26 दिवसात दुसऱ्या राशीमध्ये गोचर करतो. या दरम्यान शुक्र त्याच्या नक्षत्रातमध्ये दोन ते तीन वेळा बदल करतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक खास महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये शु्क्र ग्रहाला एक विशेष महत्त्व असून तो धन, विलासी जीवन, प्रेम आणि भौतिक सुखाचा दाता आहे. भगवान शुक्र 24 ते 26 दिवसात दुसऱ्या राशीमध्ये गोचर करतो. या दरम्यान शुक्र त्याच्या नक्षत्रातमध्ये दोन ते तीन वेळा बदल करतो.

ज्योतिष्य गणनेनुसार देवगुरु गुरूच्या नक्षत्रात शुक्र ग्रह स्थित आहे. अलीकडे 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7:51 वाजता शुक्राचे पूर्वाभाद्रपद नक्षत्रात गोचर झालं होतं. ज्या ठिकाणी शुक्र 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8:37 पर्यंत असणार आहे. मात्र शुक्राचं हे नक्षत्र गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी धोकादायक असणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मेष रास

शुक्राच्या नक्षत्र गोचरचा मेष राशीच्या लोकांवर अशुभ प्रभाव पडणार आहे. व्यावसायिकाचा कोणताही महत्त्वाचा सौदा वेळेवर पूर्ण होणार नाही. ज्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. यावेळी वृद्धांची तब्येत थोडी खराब राहू शकते. जर तुम्ही योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही तर तुम्हाला येत्या काही दिवसांत हॉस्पिटलच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतील.

कर्क रास

गुरु ग्रहाच्या नक्षत्रात शुक्राच्या गोचरमुळे कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात विविध समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे कर्क राशीचे लोक वाईट मूडमध्ये असतील.

मीन रास

आगामी काळात मीन राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. नोकरदार लोकांचं आर्थिक नुकसान होणार आहे. काही दिवस पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागणार आहे. विवाहित लोकांचे मुलांशी भांडण होऊ शकते. भाऊ-बहिणीमध्ये पुन्हा एकदा मतभेद होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT